शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

जेव्हा किन्नरांच्या रुपात प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 08:00 IST

Nagpur News राज्यात प्रथमच आयोजित केलेल्या किन्नर पाककृती स्पधेत नागपूरच्या मोहिनी व सोनू या जोडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय किन्नर पाककृती स्पर्धेत नागपूरच्या मोहिनी व सोनूने पटकावले दुसरे स्थाननागपूरीयन मेजवानीत बनवले सावजीसह गोडाधोडाचे चविष्ट पदार्थ 

नागपूर: जे हात दिवसभर भटकत टाळ्या वाजवून आपली उपजिवीका करतात, त्या हातांमधून जेव्हा प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते तेव्हा, त्याचा झालेला आनंद हा काही औरच असतो. हे अगदी नेमकेपणाने म्हणजे, मोहिनीच्या शब्दात सांगायचं झालं तर, " पिछले साल मुझे मिस ट्रान्स ब्युटी २०२१ यह पुरस्कार मिला था.. मगर आज खाना बनाकर जो आनंद मिला और उस खाने को सराहा गया, उसकी खुशी को शब्दोंमे बयान नही कर पाऊंगी.. यह माँ अन्नपूर्णा का हमे आशीर्वाद मिला हप्त ऐसा में मानती हूं... "प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या संकल्पनेने आणि मोरूभाऊ सातपुते स्मृती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तृतीयपंथीय समाजासाठी राज्यस्तरीय ह्यट्रान्सकुकह्ण पाककला स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादला यापूर्वी ही स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर १४ जूनला नागपूरला स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. आज बुधवारी सिव्हील लाईन्सस्थित जवाहर विद्याथीर्गृहात अंतिम फेरी ठेवण्यात आली होती. यामध्ये चारही शहरातून विजेते ठरलेल्या १६ स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धकांच्या आठ जोड्या करण्यात आल्या.या जोड्यांनी पदार्थ तयार करून दाखविले. त्यांच्यातील पाककलेच्या कौशल्याने प्रत्येक जोडी तोडीसतोड ठरली. यामध्ये पुण्याची निकिता-नेगण ही प्रथम, नागपूरच्या मोहिनी-सोनू या जोडीला द्वितीय तर पुण्याच्याच संतोषी-कलाश या जोडीला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. मुंबईच्या मयुरी-श्रीदेवी यांच्या जोडीला प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले. अंतिम फेरीचे निरीक्षण मैत्र्या लोवळेकर, अनुराधा हवालदार, विशाखा पवार, राधा सहस्रभोजनी व सुजाता नागपुरे यांनी केले.नागपुरीयन मेजवानीनागपूरच्या मोहिनी व सोनू यांनी नागपुरीयन मेजवानी या शीर्षकांतर्गत, सावजी पनीर बटर मसाला, पुरी, ठेचा, आमरस, कच्च्या केळाचा मुरब्बा, कढी, लच्छा पराठा, भजी व बासुंदी असा भरगच्च मेनू अवघ्या एका तासात बनवला. 

टॅग्स :LGBTएलजीबीटीTransgenderट्रान्सजेंडर