शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोणीच नसताना ‘हे’ होतात विसरलेल्यांचे सोबती फक्त शोधतच नाही, तर हरवलेलं अस्तित्वही परत मिळवून देतात

By नरेश डोंगरे | Updated: May 27, 2025 22:41 IST

बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात.

नरेश डोंगरे

नागपूर : बक्कळ पैसा, नोकरी अन् छोकरी मिळविण्यासाठी समाजातील बहुतांश जण प्रयत्नरत असतानाच काही जण मात्र स्वत:ला विसरलेल्या मंडळींना शोधण्यासाठी धडपडत असतात. समाजदूत म्हणून काम करणारी ही मंडळी ‘प्रोफेशनल’ नसल्याने त्यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडत नाही. मात्र, जेव्हा त्यांचे कर्तृत्व पुढे येते तेव्हा समाज त्यांंना सॅल्युट केल्याशिवाय राहत नाही. आठ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांना मायेचा हात देणारी अशीच मंडळी ‘लोकमत’च्या नजरेस आली आहे. ही मंडळी स्वत:ला विसलेल्यांना फक्त शोधतच नाही तर त्यांना त्यांचे अस्तित्व परत मिळवून देण्यासाठीही झटते. 

स्वत:चा विसर पडल्याने जगभराच्या वेदना सोबत घेऊन फिरणारी मंडळी म्हणजे मनोरुग्ण. वेगवेगळ्या कारणांमुळे मनोरुग्ण झाल्यानंतर ते कोण, कुठले, याचे त्यांना स्मरणच उरत नाही. ते कशासाठी जगत आहे, त्याचेही त्यांना भान नसते. फाटके, मळके कपडे घातलेले किंवा उघडेनागडे दिसणारे हे बिचारे नुसतेच भटकत असतात. समाज, कुटुंबीयच काय, त्यांना स्वत:चीही पर्वा नसते. एकीकडे रखरखत्या उन्हात स्वत:ला चटके देत ते अनवाणी फिरतात, तर दुसरीकडे हाडं गोठविणाऱ्या थंडीत रात्री उशिरापर्यंत त्यांची उघडीनागडी भटकंती बघायला मिळते. कुणी दिले तर ठीक, नाही तर रस्त्यावर पडलेले काहीही उचलून खायचे अन् कोणतेही पाणी पिऊन पुन्हा पायाला भिंगरी बांधायची, अशी त्यांची दिनचर्या असते. याउलट वाईट स्थिती त्यांच्या कुटुंबीयांची असते. आपल्या माणसाला शोधण्यासाठी मनोरुग्णाचे नातेवाईक प्रचंड मानसिक आणि शारीरिक यातना सहन करीत असतात. अशांच्याच मदतीला धावून जाण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे काम नागपुरातील सुमंत नारायणराव ठाकरे, आशिष कांबळे, प्रीतम भामरे आणि त्यांचे मित्र करीत आहेत. एमएलसी फाउंडेशन, सिंहगर्जना युवा मंच, टीडब्ल्यूझेड फाउंडेशन, तसेच राज्यातील नागपूर, पुणे, ठाणे आणि रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने ते मनोरुग्ण शोधण्याची मोहीम राबवीत आहेत.८ वर्षांत दोनशेवर मनोरुग्णांची मदत

या मित्रांनी गेल्या ८ वर्षांत राज्यात ठिकठिकाणी दोनशेवर मनोरुग्णांना शोधले. अलीकडे जानेवारी २०२५ सिंधुदुर्गमध्ये ७ मनोरुग्ण, फेब्रुवारी २०२५ मध्ये नागपूर जिल्ह्यात ९, मार्च २०२५ - कोल्हापूर, चिपळूणमध्ये २, एप्रिलमध्ये रत्नागिरीत ३ अशा २१ मनोरुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करून घेतले. त्यातील १३ जणांच्या कुटुंबीयांचाही पत्ता मिळवला अन् त्यांना त्यांचे गोकुळ परत मिळवून देण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. ५ जणांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून, ३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असल्याचे सुमंत सांगतो.