शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

दहशतवादी न्यायालयात शिरतात तेव्हा...

By admin | Updated: June 25, 2016 02:57 IST

‘आता आता चार दहशतवाद्यांनी जिल्हा न्यायालयाच्या दगडी इमारतीतील न्यायालय क्रमांक सहामध्ये घुसून न्यायाधीश, कर्मचारी आणि इतरांना ओलीस ठेवले आहे.

मॉक ड्रील : अन् सर्वांनी सोडला सुटकेचा नि:श्वास नागपूर : ‘आता आता चार दहशतवाद्यांनी जिल्हा न्यायालयाच्या दगडी इमारतीतील न्यायालय क्रमांक सहामध्ये घुसून न्यायाधीश, कर्मचारी आणि इतरांना ओलीस ठेवले आहे. त्यांच्याजवळ आधुनिक रायफली आणि आरडीएक्स आहे, ताबडतोब तेथे पोहोचा आणि ही माहिती कन्फर्म करून त्वरित कळवा’ अचानक बिनतारी संदेश यंत्रणेवर हा संदेश धडकला. तत्पूर्वी याच न्यायालयातील ‘मोहरील’ ड्युटीवरील एका पोलीस कर्मचाऱ्याने सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांना आपल्या मोबाईल फोनवरून घाबरतच न्यायालयात दहशतवादी घुसल्याची माहिती दिली. सिडाम यांनी लागलीच ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला आणि सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांना दिली. दहशतवाद्यांनी न्यायालय क्रमांक सहाचा ताबा घेतल्याचे कन्फर्म होताच क्षणात जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारे रस्ते सील करण्यात आले. पोलीस नियंत्रण कक्षापुढे सदैव तैनात असलेले जलद कृती दलाचे कमांडो पथक न्यायालयाच्या दिशेने सरसावले. बॉम्ब शोधक-नाशक पथक आपले खास प्रशिक्षित श्वान आणि अत्याधुनिक यंत्रणेसह न्यायालयाच्या दगडी इमारतीनजीक दाखल झाले. त्यामागेच सायरन वाजवीत अग्निशामक दलाची दोन वाहने आणि अ‍ॅम्बुलन्सही घटनास्थळी धडकली. काही तरी भयानक घडत आहे म्हणून न्यायालय आवारातील नेहमीच्या गर्दीतील माणसे घाबरून बाहेर निसटू लागली. वकील मंडळीही ‘क्या हुआ’ म्हणत पळून जाऊ लागले. न्यायालय सुरक्षा चौकीतील पोलिसांची एकच तारांबळ उडली. सायरनच्या आवाजासह ही कुमक न्यायालय आवारात दाखल झाली. न्यायालयात दहशतवादी घुसल्याच्या माहितीने सामान्य जण थरारून गेले होते. काही वेळातच कमांडो पथकाने चार दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधून बाहेर आणले. श्वानाने आरडीक्स हुडकून काढले. स्फोटकेरोधक गणवेशातील एका पोलीस जवानाने आरडीक्सचा साठा एका खास ‘ बॉक्स’ मध्ये बंद करून तो निष्प्रभ करण्यासाठी पिटेसूर खाणीकडे खास वाहनातून रवाना केला. हा थरारक प्रकार ‘मॉक ड्रिल’ असल्याचे स्पष्ट होताच जीव मुठीत घेऊन असलेल्या न्यायालय आवारातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सायंकाळी ५.४० पर्यंत ही मॉक ड्रील सुरू होती.(प्रतिनिधी)न्यायालयातील पहिलीच मॉक ड्रीलपत्रकारांशी बोलताना सहायक पोलीस आयुक्त वाघचौरे यांनी सांगितले की, सावधगिरी आणि अति सतर्कता म्हणून ही मॉक ड्रील घेण्यात आली. जिल्हा न्यायालयातील ही पहिलीच मॉक ड्रील असावी. यात १५० पोलीस जवानांचा सहभाग होता. त्यात ३० जवान साध्या वेशात होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांची पूर्वपरवानगी घेऊनच ही मॉक ड्रील घेण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.