शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रसंतांचाच पुतळा झाकला जातो तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:21 IST

२०२० मध्ये होणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र सर्व्हेक्षणाचा संदेश देण्यासाठी जाहिरात कंपनीने तयार केलेला डिजिटल फलक थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यापुढेच उभारण्याचा प्रकार नागपुरातील आग्याराम देवी चौकात घडला.

ठळक मुद्देजाहिरात कंपनीकडून विद्रुपीकरण : गुरुदेवभक्तांनी व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२० मध्ये होणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र सर्व्हेक्षणाचा संदेश देण्यासाठी जाहिरात कंपनीने तयार केलेला डिजिटल फलक थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यापुढेच उभारण्याचा प्रकार नागपुरातील आग्याराम देवी चौकात घडला. ज्या संतांनी जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला आणि ज्यांच्या नावे राज्य सरकार ग्रामस्वच्छता अभियान चालविते, त्यांचाच पुतळा फलक उभारल्याने झाकोळल्यामुळे गुरुदेवभक्तांमध्ये रोष व्यक्त होत आहे.येथील आग्याराम देवी चौकाजवळ सुभाष रोडवर श्री गुरुदेव सेवाश्रम आहे. स्वत: तुकडोजी महाराजांनी या आश्रमाची स्थापना केली होती. या आश्रमाकडून विविध उपक्रम चालविले जातात. काही वर्षापूर्वी आश्रमाच्या वतीने गुरुदेवभक्तांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा उभारला. स्वखर्चाने त्या परिसराचे सौंदर्यीकरणही केले. आश्रमात रोज सकाळी ध्यान, प्रार्थना, परिसर स्वच्छता आदी उपक्रम राबविले जातात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुरुदेवभक्त ध्यान-प्रार्थनेसाठी आले असता महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठा डिजिटल फलक उभारलेला दिसला. त्यामुळे पुतळा, सौंदर्याकरण आणि पुतळ्यामागे लिहिलेला मानवतेचा संदेश झाकोळला होता. या संदर्भात गुरुदेवभक्तांनी अधिक माहिती घेतली असता, कसलीही अनुमती न घेता संबंधित जाहिरात कंपनीने रात्री हा फ लक लावल्याचे कळले. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून त्यांनी हा फलक हटविला. या घटनेचा सर्वच गुरुदेवभक्तांनी निषेध नोंदविला आहे.मानवता आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे जाहिरात कंपनीकडून झालेले हे विद्रुपीकरण असून कंपनीच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे. हा प्रकार अयोग्य आहे. अशोक यावले, अध्यक्ष, श्री गुरुदेव सेवाश्रम, नागपूरराष्ट्रसंतांनी आदर्श ग्राम स्वच्छता अभियान, आदर्श ग्राम निर्माण योजना अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या विद्यमाने राबविल्या. नागपुरातील मंडळही हे कार्य करीत आहे. मात्र त्यांच्याच आश्रमासमोरील पुतळा जाहिरात फलकाने झाकण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी संबंधित कंपनीवर कारवाई व्हावी. रुपराव वाघ, गुरुदेव प्रचारक

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका