शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारीच जेव्हा विरोधक होतात... स्थगन प्रस्तावाला केला विरोध, जोरदार नारेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:11 IST

विधिमंडळात साधारणत: विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज स्थगित होत असल्याचे दिसून येते. मात्र, बुधवारी विधान परिषदेत नेमके उलटे चित्र दिसून आले.

- योगेश पांडेनागपूर : विधिमंडळात साधारणत: विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज स्थगित होत असल्याचे दिसून येते. मात्र, बुधवारी विधान परिषदेत नेमके उलटे चित्र दिसून आले. बोंडअळीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाचा विरोध करत, सत्ताधारी बाकांवरील सदस्य जोरदार नारेबाजी करत, सभापतींसमोरील मोकळ्या जागी जमा झाले. सलग चार वेळा कामकाज स्थगित झाल्यानंतर, अखेर उपसभापतींनी दिवसभरासाठीचे कामकाज तहकूब केले.बुधवारी कामकाज सुरू होताच, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सुरू करण्याबाबत निवेदन केले. मात्र, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांच्या नुकसानीचा मुद्दा मांडला. येथूनच गोंधळाला सुरुवात झाली. गदारोळातच उपसभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारल्यानंतर, सुनील तटकरे यांनी बोंडअळीच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. मात्र, सातत्याने दोन दिवस स्थगनवरील चर्चा नाकारल्यानंतर परत तोच प्रस्ताव मांडणे अयोग्य आहे, अशी भूमिका सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी घेतली. उपसभापतींनी तटकरे यांना बोलणे मांडण्याची परवानगी दिल्यामुळे, सत्ताधारी बाकांवरील सदस्य संतप्त झाले आणि घोषणाबाजी करत, उपसभापतींच्या आसनासमोर गोळा झाले. दुसरीकडे विरोधकदेखील घोषणा देत, आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनीदेखील नारे देण्यास सुरुवात केली. या गोंधळात चार वेळा कामकाज स्थगित करावे लागले. सत्ताधाºयांची नारेबाजी सुरू असतानाच तटकरे यांनी प्रस्ताव मांडला. उपसभापतींनी हा प्रस्ताव नाकारला. मात्र, तरीदेखील गोंधळ सुरूच होता. अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.मंत्रीच म्हणाले, ‘न्याय द्या!’सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमकपणे स्थगन प्रस्तावाचा विरोध केला. सभापतींच्या दालनातच स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला असताना, त्यावर सभागृहात बोलण्याची आवश्यकताच नाही. शेतकºयांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर आम्ही चर्चेला तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. विरोधकांकडून त्यांच्या भूमिकेवर गोंधळ सुरू झाल्यामुळे, पाटील यांनी ‘न्याय द्या, न्याय द्या’ अशी उपसभापतींकडे विनंती केली.पंचनामे झाले कुठे? : बोंडअळीच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. बोंडअळीच्या पंचनाम्याला कुठेही सुरुवात झालेली नाही. शासन विरोधकांची गळचेपी करत आहे. शेतकºयांविषयीच्या मुद्द्यांना उचलले की, गोंधळ होत आहे. यातूनच सत्ताधाºयांचा शेतकºयांविषयीचा दृष्टीकोन दिसून येत आहे. सरकार शेतकºयांची दिशाभूल करत आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७