शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

रामझुल्याशेजारचा पूल पाडण्याची परवानगी कधी?

By admin | Updated: April 11, 2015 02:28 IST

मध्य रेल्वेने रामझुल्याशेजारचा उड्डाण पूल पाडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे

नागपूर : मध्य रेल्वेने रामझुल्याशेजारचा उड्डाण पूल पाडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मध्य रेल्वेला जुना उड्डाण पूल पाडण्याची परवानगी कधी देता, अशी विचारणा करून १७ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले.यासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १७ जानेवारी २००६ रोजी रामझुला बांधकामाचा करार झाला आहे. करारानुसार संपूर्ण प्रकल्प ४२ महिन्यांत म्हणजे आॅगस्ट-२००९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, पहिल्या टप्प्याचेच काम पूर्ण करण्यास २०१४ साल उजाडले. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४६ कोटी रुपये होता. हा खर्च आता १०० कोटींवर गेला आहे. (प्रतिनिधी)बनावट पावत्या बनवून चार कोटी हडपलेनागपूर : बनावट पावत्या सादर करून चार कोटींची फसवणूक करणाऱ्या संजीव एस. चंदन नामक आरोपीवर सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. चंद्रशेखर लखोटिया (वय ३८, रा. सोमलवार भवन माऊंट रोड) हे आर. लॉजिस्टीक प्रा. लि. चे महाव्यवस्थापक आहेत. संजीव चंदन त्यांच्या कंपनीचा ग्राहक होता. चंदनने लखोटिया यांच्या कंपनीच्या बनावट पावत्या तयार केल्या. त्याआधारे लखोटिया यांच्या कंपनीचा माल आपल्याकडे आहे असे दाखवून त्याने शासनाकडून ३ कोटी ९६ लाख रुपये लाटले. ७ आॅक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०१४ दरम्यानच्या या गैरव्यवहाराची तक्रार लखोटिया यांनी नोंदवली. त्यावरून तसेच न्यायालयाच्या आदेशावरून सदर पोलिसांनी चंदनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचे अंधेरी (उत्तर) परिसरात कार्यालय आहे.दुकानात तोडफोडनागपूर : श्यामनगरातील आर. के. ग्लास अ‍ॅन्ड अ‍ॅल्युमिनियम वर्कच्या दुकानात शिरून हेमंत नरेशप्रसाद श्रीवात्री आणि त्याच्या तीनसाथीदारांनी तोडफोड केली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. शंकर संजू बिहाडे (वय २३) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी हेमंत आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)यशोधरानगरात सुगंधी तंबाखू जप्त नागपूर : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बिनाकी मंगळवारीतील सोमेश्वर वासुदेवराव पराते (वय २६) यांच्या घरी छापा मारून ७६, ५०० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू जप्त केला. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अनंत सुधाकर महाजन (वय ४२) यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.