शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद कधी होणार ‘पेपरलेस’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 11:18 IST

डिजिटल इंडियाअंतर्गत शासनाने ई-गव्हर्नन्सचे धोरण अवलंबले आहे. शासनाचे प्रत्येक कार्यालय आता इंटरनेटशी जुळलेले असून, पेपरलेस कामावर भर देण्यात येत आहे. असे असताना जि.प.चा पंचायत विभाग आजही फाईल्सच्या गठ्ठ्यांमध्ये अडकला आहे.

ठळक मुद्देजागोजागी पडलेत फाईलचे गठ्ठेपंचायत समितीमध्येही जुन्याच पद्धतीने कामे

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल इंडियाअंतर्गत शासनाने ई-गव्हर्नन्सचे धोरण अवलंबले आहे. शासनाचे प्रत्येक कार्यालय आता इंटरनेटशी जुळलेले असून, पेपरलेस कामावर भर देण्यात येत आहे. असे असताना जि.प.चा पंचायत विभाग आजही फाईल्सच्या गठ्ठ्यांमध्ये अडकला आहे. गावागावांना ‘आपले सेवा केंद्रा’ने जोडणाऱ्या या विभागाच्या कार्यालयात कागदपत्रांचे गठ्ठे जागोजागी पडलेले आहेत.केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली आॅनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाईन केल्या जात आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व कामाचा वेग वाढविण्यासाठी आॅनलाईन कामकाजाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंतु जि.प.चा पंचायत विभाग पूर्णपणे आॅनलाईन झाला नसल्याचे कार्यालयाच्या अवस्थेवरून दिसून येते.कार्यालयाला पेपरलेस करण्यासाठी प्रशासनाने योजना राबविल्या आहेत. परंतु योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सोमवारी दुपारी यासंदर्भात जि.प.च्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी वैयक्तिक भेटण्यास सांगितले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्याशी भेट घेतली असता, त्यांनी ‘आपले सेवा केंद्रा’च्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. कार्यालयीन वेळेत केंद्र बंद होते. त्याचदरम्यान भुयारसुद्धा तेथून निघून गेले.

योजनेच्या माहितीचा अभावपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पेपरलेससंदर्भात खुलासा होऊ न शकल्याने दुसऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांना पेपरलेस वर्किंगसंदर्भात माहिती नव्हती. पण काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, योजना आहेत, पण हे वरिष्ठ अधिकारीच सांगू शकेल. कार्यालयाची परिस्थिती लक्षात घेता, पेपरलेस बनविण्याकरिता कुठलेही गंभीर पाऊल उचलण्यात आले नाही. अधिकारीसुद्धा वरिष्ठांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकताना दिसून आले. कार्यालयात उपस्थित तीन अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

टॅग्स :Governmentसरकार