शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दृष्टिहिन विद्यार्थी ‘आॅनलाईन’ परीक्षा देतात तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:42 IST

दृष्टिहिन विद्यार्थी अन् ‘आॅनलाईन’ परीक्षा. हे समीकरण ऐकूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. तसे तर दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन परीक्षा म्हणजे दिवास्वप्नच असल्याचा समज आहे. मात्र नागपुरात सोमवारी खरोखरच दृष्टिहिन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या ज्ञानचक्षूंच्या मदतीने चक्क ‘आॅनलाईन’ परीक्षा दिली आणि समाजाच्या विचारांच्या चौकटीला छेदच दिला.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत पहिल्यांदाच प्रविष्ट झाले दिव्यांग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दृष्टिहिन विद्यार्थी अन् ‘आॅनलाईन’ परीक्षा. हे समीकरण ऐकूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. तसे तर दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन परीक्षा म्हणजे दिवास्वप्नच असल्याचा समज आहे. मात्र नागपुरात सोमवारी खरोखरच दृष्टिहिन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या ज्ञानचक्षूंच्या मदतीने चक्क ‘आॅनलाईन’ परीक्षा दिली आणि समाजाच्या विचारांच्या चौकटीला छेदच दिला.‘सबकुछ आॅनलाईन’च्या जमान्यात दृष्टिहिनांनादेखील तंत्रज्ञानाने ज्ञानचक्षू उपलब्ध करुन दिले आहेत. दृष्टिहिन विद्यार्थ्यांना आता संगणक, मोबाईल वापरणे सुलभ होत आहे. केंद्र सरकारचा विज्ञान प्रचार-प्रसार विभाग आणि विज्ञान भारतीतर्फे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा घेण्यात येते. यावर्षी पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. यात नागपूरच्या अंध विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी ही आॅनलाईन परीक्षा दिली.जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून केवळ तीन विद्यार्थी प्रविष्ट झाले. विशेष म्हणजे हे तीनही विद्यार्थी नागपुरातीलच होते. ‘दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशन’तर्फे संचालित अंध विद्यालयातील नवव्या वर्गातील पूनम ठाकरे, आदित्य पाटील व हिमांशु बोकडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. शिक्षकांनी परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज केले होते. आयोजकांकडून विद्यार्थ्यांचे ‘यूझर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ प्राप्त झाले. सोमवारी दुपारी ३ वाजता ‘अ‍ॅप बेस डिजिटल’ परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम संस्थेचे सहसचिव मकरंद पांढरीपांडे यांनी ‘ब्रेल’ व ‘आॅडिओ’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरविले. विद्यार्थ्यांनी पुरविलेल्या साहित्यातून अभ्यास करून ‘आॅनलाईन’ परीक्षा दिली. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी विज्ञान मंडळाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. उमेश पालेकुंडवार उपस्थित होते. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा अर्धातास अधिक वेळ या विद्यार्थ्यांना देण्यात आला.यापूर्वी सात विद्यार्थ्यांनी दिली ‘एमएचसीआयटी’डिजिटल तंत्रज्ञानाशी अंध विद्यार्थ्यांना सुसंगत करण्याचा प्रयत्न वेळोवेळी अंध विद्यालयाकडून करण्यात येतो. यापूर्वी विद्यालयाने त्यांच्या शाळेतील सात विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन एमएचसीआयटी’ परीक्षेला प्रविष्ट केले होते. हे सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले होते. यातील एक विद्यार्थी आज इंडियन बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे मकरंद पांढरीपांडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :onlineऑनलाइनexamपरीक्षा