शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त केव्हा?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 04:53 IST

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. पण मुहूर्ताची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही.

- मोरेश्वर मानापुरेनागपूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. पण मुहूर्ताची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही.मिहान प्रकल्पात विमानतळ विकासाचा समावेश आहे. आघाडी सरकारच्या काळात पाच वर्षे निविदा निघाली नाही. २०१६च्या प्रारंभी निविदा निघाली. स्पर्धेत १२ कंपन्या होत्या. त्यातील टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या पात्र ठरल्या. पण त्यानंतरच्या प्रक्रियेची गती संथ आहे.निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या पाच कंपन्यांना देण्यात येणारा प्रारूप सवलत करारनामा (ड्राफ्ट कन्सेशन अ‍ॅग्रिमेंट) आणि महसूल प्रस्ताव (आरएफपी) एमएडीसीने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. खासगीकरणात ७४ टक्के समभाग कंपनीकडे जातील आणि राज्य व केंद्राची भागीदारी १३-१३ टक्क्यांवर येईल.कंत्राट मिळालेल्या कंपनीला १९८२ कोटी रुपये खर्चून नवीन विमानतळ उभे करायचे आहे. पहिल्या टप्प्यात १४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत दोन समांतर धावपट्ट्या कार्गो आणि टर्मिनल इमारत तसेच विविध एमआरओंचा समावेश राहणार आहे. पुढील तीन टप्पे ५४० कोटी रुपयांचे असतील.मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कागदपत्रे पाच कंपन्यांना देण्यात येतील. कंपन्यांना येणाºया अडचणींचे निराकरण बैठकीत करण्यात येईल. विमानतळ खासगीकरणाचा राज्य शासनाचा पहिलाच प्रकल्प आहे. प्रक्रियेत कुठल्याही अडचणी येऊ नयेत, याची काळजी शासन घेत आहे.- सुरेश काकाणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर