शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कृषी विद्यापीठाची जमीन कधी घेणार मोकळा श्वास ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 19:57 IST

कृषी संशोधनाचे कार्य सुरू असणाऱ्या  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा श्वास अनेक वर्षांपासून कोंडला आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या  कृषी महाविद्यालयाच्या तब्बल २६ हेक्टरहून अधिक जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. यासंदर्भात थोडेथोडके नव्हे तर ४२ न्यायालयीन खटले सुरू आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे२६ हेक्टर जागेवर अतिक्रमण : तब्बल ४२ न्यायालयीन खटले सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी संशोधनाचे कार्य सुरू असणाऱ्या  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा श्वास अनेक वर्षांपासून कोंडला आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या  कृषी महाविद्यालयाच्या तब्बल २६ हेक्टरहून अधिक जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. यासंदर्भात थोडेथोडके नव्हे तर ४२ न्यायालयीन खटले सुरू आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे विचारणा केली होती. नागपुरात विद्यापीठाच्या अंतर्गत किती जमीन येते, यातील किती जमीन केंद्र व राज्य शासनाच्या विभागांना हस्तांतरित झाली आहे तसेच किती जमीनीवर नेमके कुठे अतिक्रमण झाले आहे इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ७/१२ नुसार नागपूर शहरात कृषी महाविद्यालयाच्या नावे एकूण ४१०.२० हेक्टर जमीन आहे. यापैकी ५९.४८ हेक्टर जमीन ही केंद्र व राज्य शासनाच्या विभागांना हस्तांतरित करण्यात आली आहे. उर्वरित ३५०.७२ हेक्टर जमीन कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात आहे. मात्र त्यातील २६.६९ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण प्रामुख्याने रामदासपेठ, बजाजनगर, फुटाळा, सिताबर्डी, दाभा, तेलंगखेडी परिसरात आहे.या जमिनीवर २२ अतिक्रमणे आहेत. यापैकी २० अतिक्रमणांसंदर्भात कृषी विद्यापीठाने न्यायालयीन खटले दाखल केले आहेत. यातील १४ अतिक्रमणकर्त्यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपासून या जागेवर अतिक्रमण केले आहे. कायदेशीर कारवाईला १९७६ पासून सुरुवात झाली. यातील एकाही खटल्याचा अद्याप निकाल लागलेला नाही. रामदासपेठेतील जमीनीवर असलेल्या अतिक्रमणावरील व्यावसायिक उपक्रमाबाबत २००९-१० मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ एकदा पाहणी केली होती.सर्वोच्च न्यायालयात २ प्रकरणेअतिक्रमित जमिनीसंदर्भात विविध न्यायालयात एकूण ४२ खटले सुरू आहेत. यातील २ खटल्यांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तर उच्च न्यायालयात ६ प्रकरणे आहेत. जिल्हा न्यायालयाकडे ११ प्रकरणे आहेत.

टॅग्स :agricultureशेतीuniversityविद्यापीठ