शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेली विदेशी तरुणी सुखरूप पोहचते तेव्हा ...

By admin | Updated: July 27, 2016 02:39 IST

पर्यटनासाठी आलेली एक विदेशी तरुणी ग्रामीण परिसरात उतरते. सोबत दुसरे कुणीही नसल्याने आणि भाषेची अडचण असल्याने ती गोंधळते....

नागपूर : पर्यटनासाठी आलेली एक विदेशी तरुणी ग्रामीण परिसरात उतरते. सोबत दुसरे कुणीही नसल्याने आणि भाषेची अडचण असल्याने ती गोंधळते. तशात तिची प्रकृती बिघडल्याने कावरीबावरी झालेल्या या तरुणीभोवती सडकछाप मजनू गोळा होतात. प्रकरण भलत्याच वळणावर जाण्याचे संकेत असतानाच एक सद्गृहस्थ पोलिसांना कळवितो. लगेच पोलीस पोहचतात. तरुणीला पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर प्रथमोपचार करून तिची वास्तपुस्त केली जाते. दिलासा मिळाल्यामुळे तिही सावरते. नाव, गाव, पत्ता, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक कळविला जातो. पोलीस लगेच अमेरिकेन दूतावासाच्या माध्यमातून तिच्या आईशी संपर्क करतात. तिची आई नागपुरात येईपावेतो तिला एका हॉटेलमध्ये ठेवले जाते. आई येते, तरुणीला पोलीस तिच्या आईच्या हवाली करतात. मायलेकी पोलिसांचे आभार मानत अमेरिकेत निघून जातात. एका प्रकरणाचा सुखद शेवट होतो. हा प्रकार म्हणजे कुण्या चित्रपटातील प्रसंग नव्हे. ही रियल स्टोरी आहे. दीड महिन्यापूर्वी कळमन्यात घडलेली! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारी लुसी चेन (वय २२) ही तरुणी जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दीड महिन्याच्या पर्यटनासाठी आली. दिल्लीहून ती बेंगळुरु येथे गेली. तेथील हॉटेलमध्ये काही दिवस मुक्काम केल्यानंतर विपश्यनेसाठी ती रायपूरला (छत्तीसगड) येथे गेली. पासपोर्ट, व्हिजासह महत्वाची कागदपत्रे बेंगळुरु येथेच राहून गेल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे रायपूरहून ती नागपूर मार्गे पुन्हा बेंगळुरुला जायला निघाली. बसने येताना चुकून ती पारडीत (नागपूर समजून) उतरली. बराच वेळ इकडे तिकडे फिरल्यानंतर आपण हरविल्याचे (वाट चुकल्याचे) तिच्या लक्षात आले. पारडीच्या ग्रामीण भागाचे वातावरणही तिची प्रकृती बिघडवणारे ठरले. लुसीला पाहून काही सडकछाप मजनू तिच्या अवतीभवती घुटमळू लागले. भाषेची मुख्य अडचण असल्याने लुसी चांगलीच गोंधळली. तिची ही अवस्था पाहून एका सद्गृहस्थाने कळमना पोलिसांना फोन केला. सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारी आणि प्रीती यादव नामक कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन लुसीला ठाण्यात आणले. ठाणेदार सुनील बोंडे यांनी तिची वास्तपुस्त केली. तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यामुळे लुसीला हिंमत मिळाली. तिने आपले नाव, गाव, पत्ता सांगून आईचा मोबाईल क्रमांकही कळविला. बोंडे यांनी लगेच ही माहिती वरिष्ठांच्या माध्यमातून अमेरिकन दूतावासातर्फे लुसीच्या आईला कळविली. लुसीची आई लॉस एंजेलिसवरून लगेच दिल्लीत आणि नंतर नागपुरात कळमना ठाण्यात पोहचली. तोपर्यंत लुसीचा मुक्काम कळमना मार्केटजवळच्या एका हॉटेलात होता. लुसीला पाहताच तिची आई तिला घट्ट बिलगली. लुसीने रडतच आपली प्रवासयात्रा आणि कळमना पोलिसांचा सौजन्यपूर्ण व्यवहार आईला सांगितला. कळमना पोलिसांनी नंतर या दोन मायलेकींना बेंगळुरू येथे हरविलेले लुसीचे कागदपत्र मिळवून देण्यासही मदत केली. पोलिसांचे आभार व्यक्त करीत अमेरिकन मायलेकी १८ जूनला आपल्या देशात परतल्या.(प्रतिनिधी) कौन्सिलेट जनरलने घेतली दखल लुसी अमेरिकन उद्योजकांच्या परिवारातील आहे. तिच्या आईने हा प्रकार अमेरिकन दूतावासाला सांगून कळमना पोलिसांच्या आदरातिथ्याची माहिती कळविली. त्याची दखल घेत कौन्सिलेट जनरल आॅफ द युनायटेड स्टेटस् आॅफ अमेरिकाचे कौन्सिल जनरल थॉमस वाज्डा यांनी २० जून रोजी कळमना पोलीस ठाण्याला एक पत्र पाठविले. दोन दिवसांपूर्वी हे पत्र पोलिसांना प्राप्त झाले. त्यात अमेरिकन कौन्सिलने शहर पोलिसांच्या कार्यशैलीची प्रशंसा करून त्यांचे आभारही मानले आहे.