शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मुक्या भावनांना फुटला कंठ : ‘मूकबधिर’ मुलीने सादर केले ‘जॉनी जॉनी...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:30 IST

एकेकाळी मूकबधिर असलेल्या पाच वर्षीय रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच दिल्लीहून ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेले पथक अवाक् झाले. त्यांनी मेयो रुग्णालयाच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदीसह चमूंचे कौतुक केले. या मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागाच्यावतीने आतापर्यंत १७ चिमुकल्यांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील वर्ष झालेल्या १० चिमुकल्यांना नीट ऐकायला, बोलता येते की नाही त्याची तपासणी करीत पथकाने समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेल्या पथकाने केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी मूकबधिर असलेल्या पाच वर्षीय रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच दिल्लीहून ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेले पथक अवाक् झाले. त्यांनी मेयो रुग्णालयाच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदीसह चमूंचे कौतुक केले. या मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागाच्यावतीने आतापर्यंत १७ चिमुकल्यांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील वर्ष झालेल्या १० चिमुकल्यांना नीट ऐकायला, बोलता येते की नाही त्याची तपासणी करीत पथकाने समाधान व्यक्त केले.जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात २०१७ मध्ये ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ला सुरुवात झाली. विदर्भातील हे पहिले रुग्णालय ठरले. तेव्हापासून ते आतापर्यंत डॉ. वेदी यांनी १७ रुग्णांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर ‘स्पीच थेरपी’ द्यावी लागते. त्यानंतर रुग्णाला चांगले बोलता येते. परंतु ‘इम्प्लांट’ करून एक वर्षे होऊनही अनेक मुलांना बोलता येत नसल्याची अनेक प्रकरणे मध्यप्रदेशासह इतर राज्यातही आढळून आली. या तपासणीसाठी दिल्ली येथील ऑडिओलॉजिस्ट शिल्पी नारंग व दीपक शर्मा या दोन सदस्यीय पथकाने मंगळवारी मेयोच्या ‘ईएनटी’ विभागाला भेट दिली. विशेष म्हणजे, मेयोच्या पहिल्या १० चिमुकल्यांवर केंद्र सरकारच्या ‘स्कीम ऑफ असिस्टन्स् टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’च्या (एडीआयपी) मदतीने एका कंपनीचे ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ वापरण्यात आले होते. याची तपासणी हे पथक करणार होते. परंतु दरम्यान डॉ. वेदी यांनी रुग्णांचा परिचय करून देत, रेणुका रवींद्र शिंदे या पाच वर्षीय चिमुकलीला समोर बोलविले. मूकबधिर असलेल्या रेणुकावर आठ महिन्यांपूर्वीच ‘इम्प्लांट’बसविण्यात आले होते. रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, इंग्रजीमधील ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच पथकाने तिचे आणि डॉक्टरांचे कौतुक केले. यावेळी पथकाने उपस्थित बालकांचीही तपासणी केली. त्यांच्यासोबत आलेल्या आई-वडिलांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या काही शंकांचे निरासनही केले.यावेळी आयोजित छोट्याखानी कार्यक्रमात आमदार डॉ. मिलिंद माने, पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. वीरल कामदार, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेचे अध्यक्ष व ईएनटी तज्ज्ञ डॉ. आशिष दिसावल, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर उपस्थित होते.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर