शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

... जाग आली तेव्हा तो होता मायानगरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 10:44 IST

मैहरला दर्शनासाठी गेलेला एक तरुण नागपूरला परतण्यासाठी ट्रेनमध्ये बसला आणि झोपी गेला. जाग आली तेव्हा ट्रेन मुंबईला थांबली होती. झोपेमुळे आयुष्याचा ट्रॅकच बदलून गेलेला हा तरुण म्हणजे नंदू देवगडे.

ठळक मुद्देफिल्मी दुनियेत संघर्ष करणाऱ्या नंदूचा प्रवासअनेक चित्रपट, मालिकांमध्ये केले काम

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मैहरला दर्शनासाठी गेलेला एक तरुण नागपूरला परतण्यासाठी ट्रेनमध्ये बसला आणि झोपी गेला. जाग आली तेव्हा ट्रेन मुंबईला थांबली होती. या मायानगरीत कुणाचा आसरा नाही, खिशात पैसा नाही, अशा अवस्थेत त्याच्या जगण्याची धडपड सुरू झाली. मात्र हा कदाचित मातेने दिलेला मायानगरीचा संकेत असेल, असा विचार करून त्याने फिल्मी दुनियेतील संघर्षाला सुरुवात केली. झोपणे हे बहुतेकांना आळसाचे लक्षण वाटत असले तरी झोपेमुळे आयुष्याचा ट्रॅकच बदलून गेलेला हा तरुण म्हणजे नंदू देवगडे.मायानगरीच्या संघर्षात त्याला बऱ्यापैकी यश मिळत असून तो आता मुंबईमध्ये स्थिर होऊ पाहत आहे. गेल्या दोन-तीन वर्षात त्याने ५ चित्रपट व १७ टीव्ही मालिकांमध्ये लहान मोठ्या चरित्र भूमिका केल्या आहेत. यामध्ये लापतागंज, चिडीयाघर, सावधान इंडिया, तारक मेहता... आदींचा समावेश आहे. कंगना, रेड सिग्नल, फ्रेन्ड रिक्वेस्ट आदी काही चित्रपटांमधूनही त्याने भूमिका साकारल्या आहेत. मात्र इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. नंदूच्याच शब्दात, गावखेड्यात राहणाऱ्या अभावग्रस्त जीवन जगणाऱ्यांचे मुंबईला पोहचणे कठीणच आणि पोहचलाच तर बॉलिवूडमध्ये काम मिळणे अशक्य. नंदू देवगडे हा मूळचा मध्य प्रदेशातील. अतिशय गरीब कुटुंबातील नंदू आपले शालेय शिक्षणही पूर्ण करू शकला नव्हता. रोजगाराच्या शोधात तो नागपूरला आला. एका फर्निचरच्या दुकानात काम मिळविले.धार्मिक वृत्तीचा नंदू एकदा मैहर येथे शारदा मंदिरात दर्शनासाठी गेला होता. परतीच्या प्रवासात झोप लागल्याने नागपूर ऐवजी तो मुंबईला पोहचला. हा कदाचित देवीचा संकेत असेल, असे मानून त्याने मायानगरीत हातपाय मारणे सुरू केले. जवळचा पैसाअडका संपलेला असताना तो अनेक दिवस उपाशी राहिला. अनेक अभिनेत्यांच्या बंगल्यासमोर रात्र घालविल्या. या संघर्षात त्याला एका व्यक्तीच्या मदतीने ईस्कॉन मंदिरात काम मिळाले. याचदरम्यान त्याने मार्शल आर्ट, जिम्नॅस्टीक व अभिनयाचे क्लासही केले.येथीलच ओळखीतून त्याना एका मालिकेत काम मिळाले आणि मिळत गेले. १७ सिरियल्स व ५ चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत व आणखी काही चित्रपट येणार आहेत. त्याचा संघर्ष संपला नाही, पण मायानगरीत तग धरण्याचा आत्मविश्वास मात्र मिळाला आहे.

टॅग्स :bollywoodबॉलिवूड