शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून गॅस लिकेज होतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:41 IST

एचपीसीएल कंपनीच्या एका मोठ्या टँकरमधून अचानक गॅस लिकेज झाले. पाहता-पाहता या लिकेजने मोठे रूप धारण करायला सुरू केले.

ठळक मुद्देवर्धा रोडवर मॉक ड्रील : २४ मिनिटात परिस्थिती नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एचपीसीएल कंपनीच्या एका मोठ्या टँकरमधून अचानक गॅस लिकेज झाले. पाहता-पाहता या लिकेजने मोठे रूप धारण करायला सुरू केले. परंतु ड्रायव्हरची समयसूचकता आणि गॅस कंपनीसह, अग्निशमन दल, महापालिका, पोलीस, वाहतूक विभाग, जिल्हा प्रशासन अणि नागरिकांच्या एकूणच समन्वय व सहकार्यातून अवघ्या २४ मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणता आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही मॉकड्रील बुधवारी दुपारी खापरीजवळ वर्धा रोडवर करण्यात आली. बुधवारी दुपारी १२.४० वाजता एचपीसीएल कंपनीचा भला मोठा गॅस टँकर घेऊन ड्रायव्हर निघाला. टँकरमध्ये गॅस भरला होता. थोड्या अंतरावर जाताच गॅस गळती होत असल्याचे ड्रायव्हरच्या निदर्शनास आले. ही गॅस गळती वाढल्यास स्फोट होऊन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. तसेच गॅसमुळेसुद्धा नुकसान होऊ शकते. ड्रायव्हरने धोका लक्षात घेऊन लगेच कंपनीच्या अधिकाºयांना फोन केला. त्यांनी तातडीने पावले उचलून कंपनीच्या सुरक्षा विभाग आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला तसेच जिल्हा प्रशासनाला तातडीने सूचना केली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे स्वत: घटनास्थळी पोहोचले. मनपाच्या सिव्हिल लाईन्समधील मुख्यालयातून अग्निशमन विभागाची एक गाडी निघाली. सोबतच नरेंद्रनगर व एमआयडीसी येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली. वाहतूक पोलिसांनी संपूर्ण वाहतूक वळती केली. संपूर्ण परिसर सुरक्षा अधिकाºयांनी आपल्या ताब्यात घेतला. परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. गॅस कंपनीच्या अधिकाºयांच्या नेतृत्वात कुलींग करण्यात आले. जवळपासची वाहने हटविण्यात आली. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी इतक्या सफाईने केली, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या नेतृत्वातील हे आॅपरेशन अवघ्या २४ मिनिटात पार पडले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. घटनेत एक वाहनचालक किरकोळ जखमी झाला. प्रथमोपचारानेच तो बरा झाला. या घटनेमुळे काही वेळासाठी नागरिक हादरून गेले होते. परंतु काही वेळानंतर ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.जागतिक आपत्ती निवारण आठवडाजिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण केंद्रातर्फे जागतिक आपत्ती निवारण आठवडा सुरू आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. वर्धा रोडवरील मॉक ड्रिलसुद्धा याचाच एक भाग होता.