शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाला ‘अच्छे दिन’ कधी ? प्रवासी संख्येत १५ कोटींहून अधिक घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:17 IST

राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. अगोदरच तोट्यात चाललेल्या महामहामंडळाला २०१६-१७ या वर्षात २३०० कोटींहून अधिक तोटा झाला.

ठळक मुद्देवर्षभरात महामंडळाचा तोटा २३०० कोटींवर

ऑनलाईन लोकमत 

नागपूर : राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. अगोदरच तोट्यात चाललेल्या महामहामंडळाला २०१६-१७ या वर्षात २३०० कोटींहून अधिक तोटा झाला. तर मागील पाच वर्षांत प्रवासी संख्येमध्ये १५ कोटींहून अधिक घट झाली असल्याची माहिती राज्य शासनाकडूनच देण्यात आली आहे. अशा स्थितीत ‘एसटी’ महामंडळाचे ‘अच्छे दिन’ कधी येतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.एसटी महामंडळातील प्रवाशांची घट रोखण्यासंदर्भात संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रुपनवर इत्यादी सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. २०१६-१७ या वर्षातील अलेखापरीक्षित वार्षिक लेख्यानुसार महामंडळाला २,३१२ कोटी ७२ लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. २०१५-१६ मध्ये हाच आकडा १,८०७ कोटी २३ लाख इतका होता, अशी माहिती लेखी उत्तरात नमूद करण्यात आली आहे. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत प्रवासी संख्येत १५ कोटी ७९ लाख इतकी घट झाल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.वर्षनिहाय तोटावर्ष                                                तोटा२०१३-१४                                   ३८२ कोटी२०१४-१५                                  ५७२ कोटी ६२ लाख२०१५-१६                                   १,८०७ कोटी २३ लाख२०१६-१७                                   २,३१२ कोटी ७२ लाखउत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरूदरम्यान, उत्पन्नात वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रवासी वाढवा योजना, आरामदायी आसन व्यवस्था, वातानुकूलित शिवनेरी बसेसची खरेदी, प्रवासी आकर्षित करण्यासाठी समाजातील २४ विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत, वार्षिक सवलत कार्ड इत्यादी उपायोजनादेखील करण्यात येत आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ