शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त केव्हा? पाच कंपन्या शर्यतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 10:31 IST

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया सहा वर्षापासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगीकरण नवीन वर्षात तरी होणार का? असा सवाल आहे.

ठळक मुद्देसहा वर्षांपासून रखडली प्रक्रिया

मोरेश्वर मानापुरे।आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया सहा वर्षापासून सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. पण मुहूर्ताची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगीकरण नवीन वर्षात तरी होणार का? असा सवाल आहे.

सहा वर्षे निविदाच नाहीमिहान प्रकल्पात विमानतळ विकासाचा समावेश आहे. मिहानच्यादृष्टीने भव्यदिव्य विकास साधण्यासाठी विमानतळाचे खासगीकरण करायचे व यासाठी जागतिक निविदा काढायची असे ठरले. याआधीचे आघाडी सरकार मात्र पाच वर्षे विमानतळ ताब्यात ठेवून ही निविदा काढू शकले नाही. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर वर्ष २०१६ च्या प्रारंभी निविदा निघाली. ७ आॅगस्ट २००९ रोजी विमानतळाचे राज्य सरकारला हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर सहा वर्षे अर्थात ७ आॅगस्ट २०१५ पर्यंत विकासाची साधी निविदाही निघाली नाही. खासगीकरणाच्या स्पर्धेत १२ कंपन्या होत्या.त्यातील टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या पात्र ठरल्या. पण त्यानंतरच्या प्रक्रियेची गती संथ आहे.निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या पाच कंपन्यांना देण्यात येणारा प्रारूप सवलत करारनामा (ड्राफ्ट कन्सेशन अ‍ॅग्रिमेंट) आणि महसूल प्रस्ताव (आरएफपी) एमएडीसीने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरीनंतर ही कागदपत्रे पाच कंपन्यांना देण्यात येतील. जी कंपनी अधिकाधिक महसूल मिळवून देण्याचे हमीपत्र देईल, त्या कंपनीला विमानतळ विकास संचालनालयाची जबाबदारी दिली जाणार आहे. भविष्यात विमानतळाचे खासगीकरण झाल्यानंतर ७४ टक्के समभाग त्या कंपनीकडे जातील आणि राज्य व केंद्राची भागीदारी १३-१३ टक्क्यांवर येईल.कंत्राट मिळालेल्या कंपनीला १९८२ कोटी रुपये खर्चून नवीन विमानतळ उभे करायचे आहे. पहिल्या टप्प्यात १४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत दोन समांतर धावपट्ट्या कार्गो आणि टर्मिनल इमारत तसेच विविध एमआरओंचा समावेश राहणार आहे. पुढील तीन टप्पे ५४० कोटी रुपयांचे असतील.

टॅग्स :Airportविमानतळ