शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील गव्हाचे पीक वाळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:54 IST

सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे.

कालव्याचे पाणी सोडा : शेतकऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धानाची कापणी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकाला संजीवनी देण्यासाठी ओलितासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मौदा तालुक्यात हक्काचे ओलिताचे साधन नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात तलाव व बंधाऱ्यांची संख्या बरीच असली तरी बहुतांश तलाव व बंधारे दुरुस्तीअभावी गाळ साचल्याने बुजल्यागत झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून गव्हाची पेरणी केली. गव्हाचे पीक ११० ते १३० दिवसांचे आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळणार अशी आशा बाळगत गव्हाची पेरणी केली.सुरुवातीला पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडल्याने पिकाला पाणी मिळाले. त्यामुळे आजवर गव्हाचे पीक जोमदार होते. सध्या गव्हाचे दाणे भरण्याचा काळ आहे. या काळात गव्हाच्या पिकाला पाण्याची नितांत गरज असते. मात्र, याच काळात ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे.उशिरा पेरणी व थंडीचा जोर कमी झाल्याने तसेच सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने गव्हाचे दाणे अपरिपक्व राहण्याची शक्यता बाळावली असून, यातून गव्हाचे उत्पादन व दर्जा खालावणार आहे. शिवाय, काही शिवारातील गव्हाचे पीक आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गवहाचे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खात व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती