शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात व्हॉटस्अ‍ॅप अ‍ॅडमिनला हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 21:37 IST

आक्षेपार्ह पोस्टस्द्वारे एका शाळेच्या मुख्याध्यापिकेची समाजात बदनामी करणाऱ्या  व्हॉटस् अ‍ॅप अ‍ॅडमिनला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापिकेची केली बदनामीएफआयआर रद्द करण्यास नकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : आक्षेपार्ह पोस्टस्द्वारे एका शाळेच्या मुख्याध्यापिकेची समाजात बदनामी करणाऱ्या  व्हॉटस् अ‍ॅप अ‍ॅडमिनला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. अडमिनविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार देण्यात आला आहे.प्रशांत सत्राळकर (४५) असे अ‍ॅडमिनचे नाव असून तो सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी आहे. स्वत: तयार केलेल्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर त्याने संबंधित मुख्याध्यापिकेची बदनामी करणाऱ्या   पोस्टस् टाकल्या होत्या. तसेच, अनेकांना बदनामीकारक ई-मेल्स व टपाल पत्रे पाठविली होती. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर मुख्याध्यापिकेने २६ सप्टेंबर २०१६ रोजी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून सत्राळकरसह ग्रुपमधील सदस्य भारतभूषण चौगुले (६५) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४(ए)(४), २९५(ए) व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ए व ६७ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती.न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व अरुण उपाध्ये यांनी विविध बाबी लक्षात घेता चौगुलेला दिलासा देऊन त्याच्याविरुद्धचा एफआयआर रद्द केला. परंतु, सत्राळकरविरुद्ध प्राथमिक पुरावे आढळून आल्यामुळे त्याच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केवळ माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ए कलम एफआयआरमधून रद्द करण्यात आले व अन्य गुन्ह्यांमध्ये पुढील कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले.

 

टॅग्स :Courtन्यायालय