शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘आयवॉच’वर वॉच कुणाचा ?

By admin | Updated: February 26, 2015 02:11 IST

नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘आयवॉच पोलीस’ या अ‍ॅपचे लाँचिंग केले.

मंगेश व्यवहारे नागपूरनागपूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘आयवॉच पोलीस’ या अ‍ॅपचे लाँचिंग केले. अ‍ॅपच्या लाँचिंगनंतर नागपुरातील हजारो स्मार्टफोन युजर्सने हे अ‍ॅप पहिल्याच दिवशी डाऊनलोड केले. ज्या नियंत्रण कक्षातून यंत्रणा हाताळली जाणार आहे, तिथले कर्मचारी संभ्रमात होते. पोलिसांनी ज्या उद्देशाने अ‍ॅप लाँच केले, त्या उद्देशाला पहिल्याच दिवशी हरताळ फासल्याचे दिसले.सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे हे अ‍ॅप आहे. नि:शुल्क असल्याने हजारो स्मार्टफोन युजर्सने आज डाऊनलोड करून घेतले. दर दहा मिनिटाला १५ ते २० युजर्स डाऊनलोड करीत होते. यंत्रणेचे संचालन नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचारी करणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षात संगणक संच उपलब्ध केला आहे. सोबत संपर्क यंत्रणाही येथे उपलब्ध केली आहे. एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणात ही यंत्रणा कार्यरत आहे. लाँचिंगच्या पहिल्याच दिवशी नियंत्रण कक्षातील संगणक संच बंद दिसले. येथील कर्मचारी, अधिकारी ही यंत्रणा कशी हाताळावी या संभ्रमात होते. काही कर्मचाऱ्यांना अ‍ॅपबद्दल माहिती नसल्याचे आढळले. जनतेने डाऊनलोड केले असले तरी, ही यंत्रणा हाताळणाऱ्यांनी डाऊनलोड करण्याची तसदीही घेतली नव्हती. काही कर्मचाऱ्यांजवळ स्मार्ट फोनही नव्हते. पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाकडून मिळालेला प्रतिसाद अतिशय उदासीन होता. येथील संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, याचे प्रशिक्षण मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अ‍ॅप निर्मात्या कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता, यासाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, यंत्रणेत जर त्रुटी असतील, तर लवकरच दूर होतील, असे त्यांनी सांगितले.