शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातांत नेमके बळी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:41 IST

उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या माहितीत तफावत : मृत्यूच्या आकडेवारीबाबत प्रशासकीय गोंधळ योगेश पांडे।

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील रस्ते अपघातांमध्ये नेमके किती बळी गेले याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे २०१६ साली नागपुरातील अपघातांमध्ये ३०७ बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत हाच आकडा ३१० इतका आहे. मृतांच्या आकडेवारीत केवळ तीनचा फरक असला तरी यातून प्रशासकीय गोंधळ निश्चितच समोर आला आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर झालेल्या अपघातांचा अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांतील आकडेवारीदेखील आहे. २०१६ साली नागपुरात १ हजार ३७३ अपघात झाले व यात ३०७ बळी गेले असे नमूद आहे. मात्र नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाची आकडेवारी वेगळेच आकडे देत आहे.‘लोकमत’कडे २२ एप्रिल २०१७ रोजी माहितीच्या अधिकारात वाहतूक विभागाने दिलेली रस्त्यांची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार शहरात २०१६ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ३१० नागरिकांचा मृत्यू झाला होता असे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालय आणि वाहतूक शाखेच्या आकडेवारीत तीन मृत्यूंचा फरक आहे. मंत्रालयाला ही माहिती शहर प्रशासनाकडूनच पुरविण्यात आली असेल. बळींच्या फरकाचा आकडा मोठा नसला तरी प्रशासकीय पातळीवर ही बाब गंभीरतेने घेतली जाणारी निश्चितच आहे. शिवाय मृतांचा आकडा नेमका किती असा संभ्रमदेखील निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे खुद्द नागपूरचे असतानादेखील त्यांच्या शहरातील आकडेवारीबाबत इतकी तफावत असेल तर बाकी शहरांत काय स्थिती असेल असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.