शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मंत्री नसलेले सरकार विदर्भाला काय न्याय देणार? विदर्भ राज्य आंदोलन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:58 IST

ज्या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत, मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, ते सरकार विदर्भाला काय न्याय देणार, असा परखड प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसहा दिवसासाठी सरकार विदर्भात येतेच कशाला?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाला बळजबरीने महाराष्ट्रात सामील करण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ साली नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नागपुरात पाच आठवड्याचे अधिवेशन घेण्याचा करार करण्यात आला होता. त्यातून विदर्भातील जनतेचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती. मात्र ज्या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत, मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, ते सरकार विदर्भाला काय न्याय देणार, असा परखड प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे.नागपुरातील अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीने सहा दिवसासाठी विदर्भात येताच कशाला, असा प्रश्न पत्रकातून उपस्थित करून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. विदर्भातील तरुणांना २३ टक्के नोकऱ्या, उच्चपदाच्या नोकरीमध्येसुद्धा २३ टक्के विदर्भाचा वाटा, महाराष्ट्राच्या तिजोरीमधील २३ टक्के वाटा विदर्भाच्या विकासावर खर्च, विदर्भात नागपूरला पाच आठवड्याचे अधिवेशन, महाराष्ट्र राज्यातील सर्व संचालकांचे मुख्य कार्यालये नागपूरला आणणे आदी अनेक आश्वासनांचा समावेश या करारात होता. परंतु यापैकी एकही आश्वासन महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत पूर्ण केले नाही. हा वैदर्भीय जनतेचा विश्वासघातच आहे. हा करार पाळण्यातच न आल्याने या कराराला काहीच अर्थ उरला नाही.महाराष्ट्र सरकारकडूनच या कराराचा भंग होत असल्याने महाराष्ट्रात राहायचेच कशाला, त्यापेक्षा हक्काचा वेगळा विदर्भ द्या, अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे.नागपूरला अधिवेशनासाठी येऊन जनतेचे १५-२० कोटी रुपये उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे. यंदाच्या सहा दिवसाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचे तास नाहीत. त्यामुळे कोणतेही फलित निघणार नाही. सरकारचे अजून मंत्रिमंडळ पूर्ण झाले नाही, खातेवाटप होऊ शकले नाही, हे सरकार विदर्भाचे व शेतकऱ्यांचे काय भले करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी करणाऱ्या या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी करावी, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही या पत्रकातून मुख्य संयोजन राम नेवले यांनी केली आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन