शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धारावीची पुनरावृत्ती झाली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 18:48 IST

नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून ४ लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत धारावीची नागपुरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्लम भागातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देशहरात ४२४ झोपडपट्ट्याचार लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोविड-१९ चे हॉटस्पॉट बनले आहे. कोरोनाबाधिताची संख्या वाढत असल्याने नागपूरही हॉटस्पॉट बनले आहे. नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून ४ लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत धारावीची नागपुरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्लम भागातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरिनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या मध्य नागपूर, पूर्व व उत्तर नागपुरात झोपडपट्ट्यांची संख्या सर्वाधिक आहे. झोपडपट्टीत अनेक कुटुंबे आठ बाय आठच्या खोलीत वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत या भागात संसर्ग झाल्यास त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात वैयक्­ितक शौचालये उभारण्यात आली. परंतु अजूनही स्लाम भागात मोठ्या प्रमाणात सामूहिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो. दाट लोकवस्ती असल्याने संसर्गाचा अधिक धोका संभवतो. नागपूर शहरातील स्लम भागांत ६८ सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो.मध्य नागपुरात स्लममध्ये १,११,२७५ नागरिककोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या मध्य नागपुरात १ लाख ११ हजार २७५ नागरिक झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत या भागाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.शहरातील झोपडपट्ट्या व वास्तव्यास नागरिक

क्षेत्र                     झोपडपट्ट्या                      लोकसंख्यादक्षिण-पश्चिम             ७३-                                ४०,०१५मध्य नागपूर               ६८-                                १,११,२७५दक्षिण                        ५५-                               २८,३६५उत्तर                         १०९-                                ६७,४११पूर्व                           ९४-                                ७२,३२२पश्चिम                       ५९-                               ५६,३८०

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस