शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर कोणत्या सुविधा पुरविणार

By admin | Updated: January 26, 2017 02:58 IST

आगामी विविध निवडणुकांमध्ये दिव्यांगांना विनाकष्ट मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी

हायकोर्टाची विचारणा : राज्य निवडणूक आयोगाला मागितले उत्तर नागपूर : आगामी विविध निवडणुकांमध्ये दिव्यांगांना विनाकष्ट मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, हॅन्डरेल्स यासारख्या कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला केली असून त्यावर येत्या २ फेब्रुवारी रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शासकीयइमारतींमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्ट, स्वच्छतागृहे, पार्किंग इत्यादी विशेष सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी इंद्रधनू या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिव्यांगांना मतदान केंद्रांवरही आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन याप्रकरणात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्याची अनुमती मागण्यात आली. न्यायालयाने ही अनुमती प्रदान करून वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. संस्थेची ही दुसरी जनहित याचिका होय. जुन्या इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढली होती. परंतु, महानगरपालिकेने ग्वाहीचे पालन केले नाही. परिणामी संस्थेने दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)