शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलावाचे प्रदूषण थांबविण्यासाठी काय केले? हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:01 IST

अंबाझरी तलावाचे प्रदूषण थांबविण्यासाठी गेल्या २६ जून रोजी दिलेल्या विविध आदेशांवर अंमलबजावणी केली का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिका, वाडी नगर परिषद, वन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रतिवादींना केली.

ठळक मुद्दे२० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी तलावाचेप्रदूषण थांबविण्यासाठी गेल्या २६ जून रोजी दिलेल्या विविध आदेशांवर अंमलबजावणी केली का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिका, वाडी नगर परिषद, वन विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रतिवादींना केली आणि यावर एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ही शेवटची संधी आहे, असे प्रतिवादींना सांगण्यात आले. तसेच, प्रतिज्ञापत्र असमाधानकारक आढळून आल्यास प्रत्येकावर २० हजार रुपये दावा खर्च बसवला जाईल, अशी तंबी देण्यात आली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. हिंगणा एमआयडीसीतील उद्योगांमधील रासायनिक पाणी अंबाझरी तलावात मिसळत नसल्याचे गेल्या २६ जून रोजी न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने महापालिकेला यावर तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, ‘नीरी’चा अहवालही न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करण्यात आला होता. अंबाझरी तलावात फायटोप्लॅन्कटन वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्या अहवालाद्वारे न्यायालयाला सांगण्यात आले. महानगरपालिकेने ती बाब लक्षात घेता, तलावातील फायटोप्लॅन्कटन वनस्पती बाहेर काढल्या जाईल. तसेच, ती वनस्पती आणखी वाढू नये याकरिता तलावाची नियमित स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन दिले होते. परिणामी, न्यायालयाने कारवाईचा अहवाल व नियमित स्वच्छतेचा कार्यक्रम सादर करण्याचा आदेश मनपाला दिला होता.मलमूत्र विसर्जन, अंघोळ करणे, कपडे धुणे इत्यादी गोष्टी व मोकाट जनावरांचा शिरकाव तलाव परिसरात व्हायला नको, अशी सूचनाही ‘नीरी’च्या अहवालात करण्यात आली आहे. तसेच, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तलाव परिसर वन विभागाच्या अधिकारक्षेत्रात येतो. त्यामुळे न्यायालयाने महानगरपालिका व वन विभाग यांना परिसराचे संयुक्त निरीक्षण करण्याचे व त्यानंतर आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.वाडी नगर परिषद दवलामेटी व वाडी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. त्यासंदर्भात ७ मार्च २०१७ रोजी सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु, त्याला आधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तांत्रिक मंजुरी मिळणे आवश्यक आहे.परिणामी,न्यायालयाने प्राधिकरणला या प्रकल्पांवर तीन आठवड्यात निर्णय घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु, त्यानंतर कुणीच आदेशांच्या अंमलबजावणीवर प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.हायकोर्टाने स्वत: दाखल केली याचिकागेल्या उन्हाळ्यात या तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. तलावाच्या काठावर मृत माशांचा ढीग साचला होता. दरम्यान, हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी माशांच्या मृत्यूकरिता कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणमित्रांनी केला होता. तसेच, शहरातील वृत्तपत्रांनी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. न्यायालयात राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल तर, वाडी नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. मोहित खजांची व अ‍ॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmbazari Lakeअंबाझरी तलावpollutionप्रदूषण