शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बंदिवानांची इत्थंभूत माहिती ठेवण्यासाठी काय केले? हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 01:16 IST

बंदिवानांची इत्थंभूत माहिती ठेवण्यासाठी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व कारागृह प्रशासन यांनी आपसात, तसेच, न्यायालयासोबत त्रुटीरहीत समन्वय राहण्याकरिता काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती येत्या १२ एप्रिलपर्यंत सादर करण्यात यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला या निर्देशाचे पालन करायचे आहे.

ठळक मुद्देविधी सेवा प्राधिकरणला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंदिवानांची इत्थंभूत माहिती ठेवण्यासाठी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व कारागृह प्रशासन यांनी आपसात, तसेच, न्यायालयासोबत त्रुटीरहीत समन्वय राहण्याकरिता काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती येत्या १२ एप्रिलपर्यंत सादर करण्यात यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला या निर्देशाचे पालन करायचे आहे.सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्या निर्णयाविरुद्ध एका महिला बंदिवानाने १० वर्षांपर्यंत उच्च न्यायालयात अपील दाखल केले नव्हते. तिचे अपील दाखल झाल्यानंतर अपील मंजूर झाले व आरोपी महिलेला निर्दोष सोडण्यात आले. तसेच, अन्य एका प्रकरणात अपील प्रलंबित असलेल्या एका आरोपीच्या निधनाची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने मयत आरोपीच्या अपीलवर अंतिम सुनावणी सुरू केली होती. ही दोन्ही प्रकरणे कारागृह प्रशासन व राज्य विधी सेवा प्राधिकरण याच्या उदासीनतेची उदाहरणे होती. परिणामी, २०१५ मध्ये न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना होण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली.या प्रकरणात महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करून कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणने कारागृह प्रशासनासोबत समन्वय ठेवणारे सॉफ्टवेयर तयार केल्याचे व त्यात बंदिवानांची वर्तमान संख्या, नवीन न्यायाधीन बंदिवानांचा प्रवेश इत्यादीची माहिती अपलोड केल्या जात असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने न्यायाधीन बंदिवान आढावा समितीमध्ये कारागृह प्रशासनाचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. न्यायालयाने या बाबी लक्षात घेता वरील निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर न्यायालय मित्र आहेत.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPrisonतुरुंग