शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांमुळे शेतक-यांचे मृत्यू थांबविण्यासाठी काय केले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 21:36 IST

कीटकनाशकांमुळे होत असलेले शेतक-यांचे मृत्यू थांबविण्यासाठी काय उपाययोजना केल्या अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास करून यावर १३ आॅक्टोबरपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

नागपूर : कीटकनाशकांमुळे होत असलेले शेतक-यांचे मृत्यू थांबविण्यासाठी काय उपाययोजना केल्या अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास करून यावर १३ आॅक्टोबरपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. दोषपूर्ण कीटकनाशकांनी गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक शेतक-यांचे बळी घेतले आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाला वरीलप्रमाणे आदेश दिला.राज्यात कीटकनाशक कायदा-१९६८ व कीटकनाशक नियम-१९७१मधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. नफाखोरीसाठी कंपन्या शेतक-यांच्या जीवाशी खेळत असून, त्यांना शासन व अधिका-यांचे अभय आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मे-१९५८ मध्ये केरळ व चेन्नई येथे दोषपूर्ण कीटकनाशकांमुळे शेकडो शेतक-यांचा बळी गेला होता. त्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन समितीने कीटकनाशकांचे उत्पादन, वितरण, विक्री व उपयोगाचे नियमन करण्यासाठी कायदा तयार करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार देशात २ सप्टेंबर १९६८ पासून कीटकनाशक कायदा लागू करण्यात आला.कायद्यातील कलम ३६ अनुसार कीटकनाशके वापरासंदर्भात नियम तयार करून ते १९७१ पासून लागू करण्यात आले. कायदा व नियमानुसार शेतक-यांना कीटकनाशक वापरासंदर्भात प्रशिक्षण देणे, कीटकनाशकांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करणारे कपडे देणे व कीटकनाशकांपासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु शासन यासंदर्भात उदासीन असल्यामुळे गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक शेतक-यांना कीटकनाशकांमुळे प्राण गमवावे लागले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्ययातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे यांनी बाजू मांडली.