शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

-तर शासनाच्या मदतीने होणाऱ्या संमेलनाचा फायदा काय? संमेलनाध्यक्ष किशोर सानप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 01:52 IST

साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.

ठळक मुद्दे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. किशोर सानप यांनी केला. यवतमाळात होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून टीका होत असताना, डॉ. किशोर सानप यांनी साहित्याच्या व्यासपीठावरून पुन्हा फुंकर घातली आहे.पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दीक्षाभूमीजवळील बी.आर.मुंडले शाळेच्या प्लॅटिनम सभागृहात करण्यात आले आहे. शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक व समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, निखिल मुंडले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विष्णू मनोहर, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, उपाध्यक्ष विजया ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना नंदा जिचकार म्हणाल्या की, समाजाचा समतोल राखण्याचे काम साहित्यात आहे. नवीन पिढीला साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीवर माझा आक्षेप असून मुलांना प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच दिले पाहिजे, असे झाल्यास साहित्यबद्दल नव्या पिढीमध्ये गोडी निर्माण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. उपाध्याय म्हणाले की, साहित्यात माणसाचे मन वळविण्याची शक्ती आहे. जी गोष्ट काठीने होऊ शकत नाही, ती उपदेशाने झाल्याची अनुभूती मला कारागृहामध्ये काम करताना आली. जिथे साहित्याची चर्चा होते, तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते. साहित्यात दैवी ताकद आहे. माणसाचे टेन्शन घालविण्यास गोळीपेक्षा साहित्य जास्त असरदार आहे. कायदा आणि साहित्य हातात हात घालून चालल्यास समाज आणि मनाचे परिवर्तन होऊ शकते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना विष्णू मनोहर म्हणाले की, चांगले संगीत, नाटक, साहित्य आणि भोजन असेल तर कुठलाही सोहळा आनंददायी ठरतो. राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात हा योग आला आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर