शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

त्या अनधिकृत धार्मिकस्थळांवर काय कारवाई केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:12 IST

कारवाईवर आक्षेप घेणाऱ्या किती अनधिकृत धार्मिकस्थळांनी त्यांना देण्यात आलेल्या आदेशानुसार न्यायालयात पैसे जमा केले आणि पैसे जमा केले नाहीत अशा अनधिकृत धार्मिकस्थळांवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती एक आठवड्यात सादर करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महापालिकेला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : मनपाला मागितली पैसे भरणाऱ्यांची माहिती

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारवाईवर आक्षेप घेणाऱ्या किती अनधिकृत धार्मिकस्थळांनी त्यांना देण्यात आलेल्या आदेशानुसार न्यायालयात पैसे जमा केले आणि पैसे जमा केले नाहीत अशा अनधिकृत धार्मिकस्थळांवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती एक आठवड्यात सादर करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरण पटलावर येताच न्यायालयाने आतापर्यंत किती अनधिकृत धार्मिकस्थळांनी पैसे जमा केले अशी विचारणा मनपाला केली; परंतु मनपाकडे याचे उत्तर नव्हते. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करून वरील आदेश दिला. तसेच, यासंदर्भात याचिकाकर्त्यांना पडताळणी करण्यास सांगितले. याविषयी न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे.मनपाने अनधिकृत धार्मिकस्थळांना कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यामुळे वादातीत धार्मिकस्थळांनी १८२७ आक्षेप मनपाकडे दाखल केले आहेत. न्यायालयाने २ आॅगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार गेल्या तारखेपर्यंत २५४ आक्षेपकर्त्या धार्मिकस्थळांनी प्रत्येकी ५० हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर उर्वरित धार्मिकस्थळांना २१ आॅगस्टपर्यंत प्रत्येकी ६० हजार रुपये जमा करण्याचा आदेश देण्यात आला होता. कारवाईवर आक्षेप घेणाऱ्या अनधिकृत धार्मिकस्थळांना त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी न्यायालयात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले असले तरी, कारवाई करण्याच्या आदेशावर स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी मोकळी आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे