शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजांवर काय कारवाई केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 20:34 IST

नफाखोरीसाठी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली असा सवाल विचारून येत्या १४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील रेकॉर्ड सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा सवाल : रेकॉर्ड सादर करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नफाखोरीसाठी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली असा सवाल विचारून येत्या १४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील रेकॉर्ड सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या कि मती नियंत्रित ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. एस. डी. चांदे यांनी साठेबाज व्यापाऱ्यांना शासनाकडून मिळत असलेल्या संरक्षणाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांत सक्षम अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साठेबाजांवर धाडी टाकून सुमारे १७ कोटी रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू जप्त केल्या होत्या. त्यानंतर त्या वस्तू व्यापाऱ्यांना परत करण्यात आल्या. त्यावरून शासन व्यापाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचे स्पष्ट होते असे त्यांनी सांगितले. सदर बाब लक्षात घेता न्यायालयाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना हा आदेश दिला.डाळी व इतर वस्तूंपासून मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वे प्राप्त होतात. अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्यामुळे नागरिकांच्या कमाईचा मोठा भाग या वस्तू खरेदी करण्यावर खर्च होत आहे. या वस्तू थोडी प्रक्रिया करून बाजारात आणल्यानंतर त्यांची चढ्या भावाने विक्री केली जाते. त्यातून ठोक व चिल्लर व्यापारी भरमसाठ नफा कमावतात. महागाईमुळे अनेकांना या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केंद्र व राज्य शासन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसंदर्भात धोरण ठरविण्यात अपयशी ठरले आहे. परिणामी या वस्तुंच्या  किमती सतत वाढत आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfoodअन्न