शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१५ उपाययोजना जाहीर पण उद्योगधंदे सुरू करण्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 09:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० लाख कोटींच्या ‘पॅकेज’ची माहिती देण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ६ लाख २० हजार कोटींच्या १५ उपाययोजना जाहीर केल्या. परंतु त्यानंतरही ‘लॉकडाऊन’मुळे बंद झालेले उद्योगधंदे कसे सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० लाख कोटींच्या ‘पॅकेज’ची माहिती देण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ६ लाख २० हजार कोटींच्या १५ उपाययोजना जाहीर केल्या. परंतु त्यानंतरही ‘लॉकडाऊन’मुळे बंद झालेले उद्योगधंदे कसे सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.सीतारामन यांच्या घोषणांमध्ये सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना विनातारण कर्जासाठी ३ लाख कोटी, या उद्योगांच्या भांडवल पुरवठ्यासाठी ३० हजार कोटी, सक्षम ‘एमएसएमई’साठी ५० हजार कोटी, सूक्ष्म वित्तीय कंपन्यांसाठी ४५ हजार कोटी, गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी ३० हजार कोटी, वीज वितरण कंपन्यांसाठी ९० हजार कोटी (२ योजना) व ‘टीडीएस-‘टीसीएस’ कपातीसाठी ५० हजार कोटी असे ६ लाख २० हजार कोटींचे प्रावधान आहे.याशिवाय राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, पायाभूत सुविधा, कंत्राटदारांना सहा महिने मुदतवाढ, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा महिने मुदतवाढ, मालकी व भागीदारी कंपन्यांना प्राप्तिकराचा त्वरित परतावा तसेच आयकर विवरणपत्र व तारखांमध्ये सहा महिने मुदतवाढ अशा घोषणा आहेत. यांचा आर्थिक लाभ निश्चित करणे कठीण आहे.उद्योगांच्या समस्या वेगळ्याचगेले ४५-५० दिवस संपूर्णत: बंद असलेल्या उद्योगधंद्यांसमोर सर्वात मोठे संकट आहे ते कामगारांचे. इतर राज्यातील जवळपास ४ कोटी कामगार त्यांच्या गावी परत गेले आहेत. त्यांना परत कसे आणायचे, ही मोठी समस्या आहे. सध्या बस, ट्रक, रेल्वे बंद आहेत. त्यामुळे उद्योग सुरू करायचा असेल तर कच्च्या मालाचा पुरवठा ही मोठी समस्या आहे.याशिवाय वरील दोन्ही समस्या सोडवून उद्योग सुरू केला तरी तयार झालेला माल घेणार कोण, हा मोठा प्रश्न आहेच. कारण सर्वच मालांची मागणी सध्या जवळपास नगण्य झाली आहे. निर्मला सीतारामन यांच्या घोषणा उद्योग सुरू झाल्यानंतर वित्त पुरवठा, पत पुरवठा, कर सवलती, पैसे भरण्यासाठी मुदत अशा स्वरूपाच्या आहेत. पण बंद पडलेल्या उद्योगधंद्यांना सुरू करण्यासाठी या ‘पॅकेज’मध्ये काही नाही. त्यामुळे उद्योगधंदे सुरू कसे होणार, हा प्रश्न कायम आहे.पंतप्रधानांच्या २० लाख कोटींच्या ‘पॅकेज’ची माहिती देण्यासाठी ही पहिली पत्रपरिषद आहे. यानंतर आणखी २-३ पत्रपरिषदा होतील, असे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील पत्रपरिषदेत उद्योग सुरू करण्यासाठी काही ठोस घोषणा होतात का, याचे सर्वांनाच औत्सुक्य आहे.

 

टॅग्स :businessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस