शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिथे वीज नाही, नेटवर्क नाही त्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 09:45 IST

कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या चार महिन्यापासून या सर्व योजना ठप्प पडल्या आहेत. आदिवासीचे सर्व विद्यार्थी आपापल्या घरात बसले आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा गंध नाही आणि दुसरा कुठला पर्यायही उपलब्ध नसल्याने आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागातर्फे काही योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या चार महिन्यापासून या सर्व योजना ठप्प पडल्या आहेत. आदिवासीचे सर्व विद्यार्थी आपापल्या घरात बसले आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा गंध नाही आणि दुसरा कुठला पर्यायही उपलब्ध नसल्याने आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर होत आहेत.१९७२-७३ पासून महाराष्ट्र शासनाने अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केली. २०१४ पासून ‘नामांकित शाळा इंग्रजी माध्यम शिक्षण योजना’ सुरू करण्यात आली. १९९०-९१ पासून ‘एकलव्य निवासी शाळा’ हा उपक्रम केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू आहे. हजारो आदिवासी विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. मात्र मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियमित शाळा, वसतिगृह बंद आहेत. मुलांचे शिक्षण, भोजन नि:शुल्क असल्यामुळे गरीब आदिवासी पालकांना मुलांची विशेष काळजी नव्हती. परंतु आता शाळा बंद असल्यामुळे मुले घरी आहेत. १ जुलैपासून शहरातील बहुतेक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेणे सुरू केले. मात्र आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. आदिवासींच्या ९० टक्के पालकांकडे स्मार्ट फोन, मोबाईल नेटवर्क, मोबाईल रिचार्जकरिता रोख रक्कम नाही, पाठ्यपुस्तके नाहीत, घरी अभ्यासाकरिता पोषक वातावरण नाही. मार्च ते जून असे चार महिने अभ्यास नसल्यामुळे बरेच आदिवासी विद्यार्थी शेतीकाम, इतर किरकोळ काम, पालकांच्या कामात मदत करीत आहेत. याचे दूरगामी परिणाम आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासावर होईल, अशी भीती आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचे या विद्यार्थ्यांच्याबाबतीत काहीच धोरण नाही. कोरोनाच्या परिस्थितीला पुढे करून शासनाने सर्व जबाबदारी गरीब आदिवासी पालकांवर थोपविली आहे.

 शासनाने जबाबदारी स्वीकारावीमार्च महिन्यापासून सर्व आदिवासी पालकांना विद्यार्थी निर्वाह भत्ता रोखीने देण्यात यावा, शालेय पुस्तके घरपोच पुरविण्यात यावी, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी स्मार्ट फोन मोबाईल डाटासह देण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी शिक्षकांना एक एक आदिवासीबहुल गावाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केली आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र