शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी व्यक्तीसोबत दारू प्यायला गेला अन दीड तोळ्याची झाली चेनस्नॅचिंग

By योगेश पांडे | Updated: July 6, 2023 19:15 IST

अनोळखी व्यक्तीने केलेली दारू पिण्याची ऑफर स्वीकारण एका कॅबचालकाला चांगलेच महागात पडले.

नागपूर : अनोळखी व्यक्तीने केलेली दारू पिण्याची ऑफर स्वीकारण एका कॅबचालकाला चांगलेच महागात पडले. दारू पिऊन बाहेर आल्यावर अनोळखी व्यक्तीने चालकाच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन खेचत पळ काढला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विशाल मेश्राम (३४, भगवाननगर) असे चालकाचे नाव आहे. विशाल रात्री अकरा वाजताच्या सुमारास मित्रासोबत एका पानठेल्यावर उभा होता. त्यावेळी तेथे दोन अनोळखी व्यक्ती आले व त्यांनी विशालला दारू पिशील का असे विचारले. फुकटात दारू भेटत असल्याने विशालने हो म्हटले व तो त्यांच्यासोबत मानेवाडा रोडवरील ब्रम्हा बारमध्ये गेला. त्याच्यासोबत आतमध्ये एकच व्यक्ती आला. दोघांनी अर्धा तास दारू पिली व त्याचे पैसे अनोळखी व्यक्तीनेच दिले. त्यानंतर ते पावणेबारा वाजताच्या सुमारास बाहेर आले असता अनोळखी व्यक्तीने विशालच्या गळ्यातील सोन्याच्या चेनला हिसका मारला व पळ काढला. विशालने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

मात्र अंधाराचा फायदा घेत अनोळखी व्यक्ती फरार झाला. विशालने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्कला कामाला लावले व निशांत सुरेश माकडे (३३, न्यू कैलास नगर) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.