शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बहुचर्चित खुनी हल्ल्यातील करण-अर्जून परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 14:06 IST

प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांवर प्राणघातक हल्ला चढवल्याच्या आरोपात फरार असलेले असंघटीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांचे करण आणि अर्जून या दोन्ही मुलांनी शनिवारी सकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून होते फरार : पोलिसांसमोर आत्मसमर्पण

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांवर प्राणघातक हल्ला चढवल्याच्या आरोपात फरार असलेले असंघटीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांचे करण आणि अर्जून या दोन्ही मुलांनी शनिवारी सकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजनी चौक, चुनाभट्टी परिसरात राहणा-या मुन्ना यादव यांच्या शेजारी मंगल यादवचे घर आहे. मुन्ना आणि मंगलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शत्रूत्व आहे. त्यांच्यात नेहमीच वादविवाद हाणामा-या होत राहतात. दिवाळी दरम्यान भाउबिजेच्या दिवशी फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून पुन्हा या दोन गटात वाद झाला. त्यानंतर मुन्ना आणि मंगलचे साथीदार एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी तलवार, रॉड आणि काठ्यांनी हल्ला चढवला. या हल्लयात दोन्ही गटातील आरोपींना जबर जखमा झाल्या. मात्र, मंगल यादवला गंभीर दुखापत झाली होती. धंतोली पोलिसांनी दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्याने पोलिसांनी मुन्ना यादव, त्यांची पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव त्यांची करण आणि अर्जून ही दोन्ही मुले तसेच त्यांच्या प्रतिस्पर्धी गटातील मंगल यादव, पापा यादव आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमविणे, प्राणघातक हल्ला चढवणे आदी आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून दोन्ही गटातील आरोपी फरार आहे. दरम्यान, लक्ष्मी यादव आणि अवधेश यादव या दोघांना अटकपूर्व जामिन मिळाला. तर, अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत होते. या पार्श्वभूमीवर, करण आणि अर्जून यादव या दोघांनी शनिवारी सकाळी धंतोली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. वृत्त लिहिस्तोवर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :ArrestअटकNagpur Policeनागपूर पोलीस