शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेलडन नागपूरकर : जनता कर्फ्यूचे उत्स्फूर्त पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 20:04 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. महापौर व मनपा आयुक्त यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे पालन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. महापौर व मनपा आयुक्त यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कार्यालये, आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद होती. सकाळी दुधाचे वितरण सुरळीत झाले. लोकांपर्यंत वृत्तपत्र पोहचले. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु पोलीस कुणावरही बळजबरी करताना दिसून आले नाही. महापौर संदीप जोशी, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे स्वत: रस्त्यावर होते. ते नागरिकांना जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन करीत होते. एकूणच अपवाद वगळता शहरात जनता कर्फ्यूला नागपूरकरांचा चांगला पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी वेलडन नागपूरकर असेच म्हणावे लागेल.रविवारी कर्फ्यूला मिळणारा प्रतिसाद तसेच सोमवार ते गुरुवार दरम्यान शिस्त व नियमाचे काटेकोर पालन होते की नाही याचे अवलोकन करून शुक्रवारी पुन्हा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक होईल. यात लॉकडाऊन लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी शिस्त आणि नियमांचे पालन केले तर पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागेल, असे संकेत महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे, त्यामुळे नागपुरात कठोर लॉकडाऊन लागू द्यायचा नसेल तर नागपूरकरांनी पहिल्या दिवशी दाखवलेली शिस्त व नियमांचे पालन येत्या काही दिवसांपर्यंत तरी कायम ठेवणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर