आगामी हिंदी चित्रपट ‘कॅलेंडर गर्ल्स’चे निर्माता व दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी बुधवारी चित्रपटातील कलावंतांसह लोकमत कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी मधुर भांडारकर यांचे स्वागत करताना त्यांना अभय घुसे द्वारा निर्मित राधाकृष्णाची शिल्पाकृती भेट दिली. यावेळी डावीकडून खासगी इलेक्ट्रॉनिक वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, अभिनेत्री शतरुपा पाईन, रूही सिंह, लोकमतचे वित्त नियंत्रक मोहन जोशी, सहाय्यक उपाध्यक्ष संजय खरे, अभिनेत्री आकांक्षा पुरी, कायरा दत्त, अवनी मोदी, चित्रपटाच्या चमूतील नदीश भाटिया आणि लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी मधुर भांडारकर यांचे स्वागत करताना
By admin | Updated: September 3, 2015 02:37 IST