शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वूई वाँन्ट जस्टीस...

By admin | Updated: November 26, 2014 01:07 IST

काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे,

बालकांची मानवी शृंखला : पंतप्रधानांना पाठविले १.१० लाख पत्रनागपूर : काहीच चूक नसताना मुलांना भीतीच्या वातावरणात वावरण्याची पाळी आली आहे. आधी कुश नंतर युग असे किती बळी गेल्यानंतर शासन यावर कठोर उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून उपराजधानीतील ५० शाळांमधील हजारो बालकांनी आज ‘वुई वॉंट जस्टीस’चा सूर काढून वर्धा मार्ग दणाणून टाकला.आठ वर्षाच्या युग चांडक याचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेच्या तीन वर्षापूर्वी कुश कटारिया या आठ वर्षाच्या बालकाचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे बालकांच्या होत असलेल्या हत्येबाबत त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी सेंटर पॉईंट ग्रुप आॅफ स्कूल्स आणि युग फाऊंडेशनच्यावतीने आज लोकमत चौक ते पंचशील चौकादरम्यान मानवी शृंखला तयार करण्यात आली. यानिमित्त ‘युग की पुकार’ या संकल्पनेवर ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्र साकारले. आंदोलनात १८ वर्षाखालील मुलांवर होणाऱ्या दुष्कृत्यांसाठी एका विशेष न्यायालयाचे गठन करून आरोपींना १०० दिवसाच्या आत कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘काय कृती कराल तुम्ही जेंव्हा युगच्या जागेवर असू आम्ही’, ‘परत नको वार एकदाच करा निर्धार’, ‘आधी कुश आता युग, काय होती दोघांची चूक’, ‘हर बेटाबेटी अपनी हे सुरक्षा इनकी करनी है’, ‘बचपन सुरक्षित होगा तो देश सुरक्षित होगा’ असे वाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन लक्ष वेधले. यावेळी समीर मेघे, माजी मंत्री अनिस अहमद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय पाटील, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, माजी आमदार यादवराव देवगडे यांनी आंदोलनात भेट दिली. यशस्वितेसाठी प्रकल्प समन्वयक संजय वलीवकर, अरुण देव उपाध्याय, मुक्ता चॅटर्जी, डॉ. मुकेश चांडक यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)युगच्या आईचे डोळे पाणावलेआंदोलनात युगचे वडील मुकेश चांडक आणि त्याची आई उपस्थित होती. युगच्या हत्येनंतर शहरातील हजारो बालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहून युगच्या आईचे डोळे पाणावले आणि तिला आपला हुंदका आवरता आला नाही. माझा युग तर गेला परंतु इतर मुलांची सुरक्षा वाढविण्याची गरज असल्याचे तिने यावेळी सांगितले.दुसरा युग, कुश होऊ नयेहिवरीनगरच्या सेंट झेविअर्स स्कूलची विद्यार्थिनी दिव्या भाजीपाले हिने दुसऱ्यांना युग, कुशसारख्या घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजात शांतता प्रस्थापित करून बालकांना सुरक्षा देण्यासाठी शासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी तिने केली.