शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चिनी उपकरणे आल्यानंतरच मिळाली हवामानाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 10:18 IST

हवामान विभागाच्या मुख्यालयाने जोर दिल्यानंतर विशेष परवानगीसह एक अभियंता चिनी उपकरणे घेऊन कारने नागपुरात आला आणि रडार दुरुस्त केले. हे उपकरणे जास्त मोठ्या आकाराचे नाही, पण त्याला चीनमधून बोलवावे लागते.

ठळक मुद्देडॉप्लर रडार दुरुस्तीसाठी दिल्लीतून नागपुरात पोहोचले अभियंता

वसीम कुरैशीनागपूर : चीनसोबतच्या तणावाच्या परिस्थितीत चीनमधून एक उपकरण आणल्यानंतरच नागपूर विमानतळावर बसविलेल्या डॉप्लर रडारने काम करणे सुरू केले आहे. उड्डाणे बंद असताना ही समस्या आली नव्हती. परंतु हवामानासंबंधी तंतोतंत माहिती देण्यासाठी डॉप्लर रडारचे काम सुरू असणे आवश्यक आहे. मेच्या अखेरीस दिल्ली मुख्यालयातून नागपुरातील डॉप्लर रडारच्या समस्येबाबत विचारणा झाल्यानंतरच त्याचे निराकरण करण्यात आले.हवामान विभागाने २०१२ मध्ये डॉप्लर रडार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसविला. ते चीनमधून खरेदी केले होते. त्याची रेंज कमाल ५०० किमीपर्यंत असून १५० ते २५० किमीची (क्लोज रेंट) तंतोतंत माहिती देतो. त्याच्या माध्यमातून ढगांची स्थिती, त्याची जाडी, त्यात असलेले पाण्याचे प्रमाण, किती वेळात जवळ येऊ शकतो, यामुळे पाऊस येणार वा नाही आदींची माहिती मिळते. विमानांच्या ये-जाच्या हिशेबाने सीबी क्लाऊडची माहिती या उपकरणाने मिळते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये रडारवरील चेंडूसारख्या भागाच्या आत फिरणाऱ्या अ‍ॅन्टिनाचे काही उपकरण खराब झाले होते. त्यामुळे एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रडार फिरणे बंद होते. मेपर्यंत हवाई सेवा बंद असल्याने रडार स्थापन करणे आणि त्यांच्या देखरेख करणाऱ्या कंपनीचा अभियंता पोहोचला नव्हता. पण हवामान विभागाच्या मुख्यालयाने जोर दिल्यानंतर विशेष परवानगीसह एक अभियंता चिनी उपकरणे घेऊन कारने नागपुरात आला आणि रडार दुरुस्त केले. हे उपकरणे जास्त मोठ्या आकाराचे नाही, पण त्याला चीनमधून बोलवावे लागते.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर