शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

आम्ही बांगलादेशच्या हिंदूंच्या पाठीशी, त्यांच्या रक्षणासाठी सर्व उपाय करणार - सुनील आंबेकर 

By योगेश पांडे | Updated: December 10, 2024 21:33 IST

नागपुरात संघ परिवारातील विविध संघटनांकडून बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात हुंकार

नागपूर : ज्या बांगलादेशचा जन्म भारतामुळे झाला तेथील कट्टरपंथी लोक आज हिंदू समाजाविरोधात कृतघ्नपणे वागत आहेत. अन्याय-अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहे. मात्र तेथील हिंदूंनी या परिस्थितीतदेखील संघर्ष सुरू ठेवला आहे. भारतातील प्रत्येक नागरिक बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची बांगलादेश सरकारसोबत चर्चा सुरू आहेच. मात्र वेळ पडली तर तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी सर्व उपाय करण्यात येतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. मंगळवारी नागपुरात संघप्रणित संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या बॅनरअंतर्गत बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार केला. त्यावेळी आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.

सकल हिंदू समाजाद्वारे विधानसभा मतदारसंघनिहाय मोर्चा काढण्यात आला. याअंतर्गत सतरंजीपुरा चौक (पूर्व नागपूर), छावणी चौक (पश्चिम नागपूर), कमाल चौक (उत्तर नागपूर), सक्करदरा चौक (दक्षिण नागपूर), बडकस चौक (मध्य नागपूर) तर अजनी चौक (दक्षिण-पश्चिम नागपूर) येथून मोर्चे निघाले व सर्वांचे व्हेरायटी चौकात एकत्रीकरण झाले. दुपारी चार वाजताच्या सुमारास व्हेरायटी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांनी केवळ दु:खी न होता मनात संताप निर्माण झाला पाहिजे. आम्ही पाकिस्तान, बांगलादेशमधील हिंदू समाजाला आपलेच मानतो. येथे कुठल्याही जातीचा प्रश्न येत नाही, तर अन्याय हिंदूंवर होत आहे हे विचारात घेतले पाहिजे. तेथील लोक मंदिरांमधील मूर्ती तोडत आहेत व तो आपल्या भावनांवर आघात आहे.

आपल्या देशातील काही नेते म्हणतात सर्वकाही विसरा असे म्हणतात. मात्र वेळोवेळी घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, हिंदूंच्या हत्याकांडाच्या घटना आपल्याला काहीही विसरु देत नाहीत. भारतातील हिंदूंची शक्ती लक्षात घेऊन बांगलादेश शासनाने तेथील अत्याचार थांबविले पाहिजेत. हिंदूंवरील अन्याय आता सहन करण्यात येणार नाही याची जाणीव तेथील पंतप्रधानांनी ठेवली पाहिजे, असा इशारा आंबेकर यांनी दिला. बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी आपण आता उभे राहिलो नाही तर तेथील कट्टरपथींयांची हिंमत वाढेल व येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. केवळ एका रॅलीपुरता हा संघर्ष मर्यादित रहायला नको असे आवाहन आंबेकर यांनी केले. यावेळी भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, आ.कृष्णा खोपडे, ॲड.धर्मपाल मेश्राम, अमोल ठाकरे, रमेश मंत्री, विश्वमांगल्य सभेच्या सविता मते, डॉ.विश्वास आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जन्म दिला तर अंतदेखील करू शकतोविहिंपचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी बांगलादेश सरकारवर टीकास्त्र सोडले. भारताने बांगलादेशला जन्म दिला. मात्र जन्म देणारा भारत त्यांचा अंतदेखील करू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे. भारताचा अहिंसेवर विश्वास असला तरी शस्त्र चालविणे आम्ही विसरलेलो नाही. भारतात बांगलादेशचे अनेक लोक राहतात. त्यांचादेखील तेथील शासनाने विचार करायला हवा, असे शेंडे यांनी म्हटले.

बांगलादेशसोबतच व्यापार बंद कराबांगलादेशला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यांना योग्य धडा शिकविण्यासाठी त्यांचा वीज पुरवठा, आर्थिक सहकार्य बंद केले पाहिजे. तसेच त्यांच्याशी सर्व प्रकारचा व्यापार बंद केला पाहिजे. अशा उपायांनीच तो देश वछणीवर येईल, असे प्रतिपादन सविता मते यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरBangladeshबांगलादेशHinduहिंदू