शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हम लड़ेंगे और जीतेंगे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:40 IST

देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा निर्धार : इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा

ऑनलाईन लोकमत नागपूर : देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला. परंतु गेल्या तीन वर्षात देशातील लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला एकसंघ ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. १९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांनी नागपुरात ‘हम हारे तो क्या हुआ, फिर जितेंगे’ असा विश्वास व्यक्त केला होता. याच नागपुरात ‘हम लड़ेंगे और जीतेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, काँग्रेसचे विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, माजी खासदार भीमराराज भाटी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी हा देश घडविला. परंतु शासनकर्ते सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून इतिहासात बदल करून या नेत्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुस्तकातून पुसाल परंतु लोकांच्या मनातून या नेत्यांना पुसता येणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे भाजपा हादरला आहे. गुजरात निवडणुकीत सोनिया गांंधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस शंभर टक्के निवडून येईल. या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची टीका चव्हाण यांनी केली.देशात परिवर्तनाचे वारे सुरू झाले आहे. नांदेड, भिवंडी, मालेगाव, गुरुदासपूर व चित्रकूट येथील निकाल याचे द्योतक आहे. व्यापारीही आता‘कमल का फूल एकही भूल’ असे म्हणत आहे. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. परंतु भाजपा सरकार गरिबाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. इंदिराजींना कठीण काळात‘लोकमत’चे जाहीर आभारइंदिरा गांधी एकविसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व होते. या पोलादी महिलेच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्या जीवनावर आधारित विशेषांक काढला. या माध्यमातून नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. या उपक्रमाचे कौतुक करून अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून लोकमतचे जाहीर आभार मानले.