शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस महाराष्ट्रातच रहावे अशी आमची इच्छा

By योगेश पांडे | Updated: August 1, 2024 18:09 IST

चंद्रशेखर बावनकुळे : राज्याच्या कल्याणासाठी फडणवीस महाराष्ट्रातच आवश्यक

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यातील नेत्यांना मात्र ते दिल्लीत जाऊ नये असेच वाटत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ठ संघटक आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्व घेईल. मात्र, राज्यातील १४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी फडणवीसांचे शासनातील व संघटनेतील स्थान महत्वाचे आहे. ते महाराष्ट्रात राहावे असेच आम्हाला वाटते, असे बावनकुळे म्हणाले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजपच्या संवाद यात्रेवरदेखील भाष्य केले. ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान भाजपा संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढणार आहे. या यात्रेदरम्यान राज्यातील मंडल स्तरावरील ७५० ठिकाणी भाजपाचे अधिवेशन होईल. भाजपाच्या ६९ संघटनात्मक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील ३६ नेते मुक्कामी जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर महानगर, नागपूर ग्रामीण व अमरावती येथे तर मी स्वत: वर्धा व भंडारा येथे अधिवेशनात सहभागी होणार आहे. या माध्यमातून राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांची माहिती आम्ही समाजातील अखेरच्या माणसापर्यंत पोहचविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

डीपीसीच्या पैशातून कॉंग्रेसने मेळावे घेतलेनागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीसीमधून विकासकामांसाठी निधी दिला. कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी या निधीचा वापर राजकीय कारणासाठी व पक्षाचे मेळावे घेण्यासाठी केला होता. आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाचे मेळावे पक्षासाठी घेण्यात आले. जनतेचा पैसा खर्च केला, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

मविआ सरकार आले तर लाडकी बहीण बंद करतीलराज्यात जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहिण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह महायुती सरकारच्या व मोदी सरकारच्या योजना बंद करतील, असा दावा बावनकुळे यांनी केला. मुंबई आणि कोंकणातून मतं गेल्याने उद्धव ठाकरे चिंतेत आहेत. त्यातूनच त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी खोटा प्रचार केला, असा आरोप त्यांनी केला. महायुतीमध्ये कोणती जागा कोण लढणार हा निर्णय युतीमधील तिन्ही पक्षाचे नेते व भाजपाचे केंद्रीय नेतृत्व घेईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर