शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भाजीपाला फेकला नाही

By admin | Updated: June 12, 2017 02:23 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही.

हंसराज अहीर : सावनेर येथे ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार चांगले कार्य करीत आहे. मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, जनधन, उज्ज्वला या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह गरिबांना चांगले दिवस येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.केंद्र शासनाने तीन वर्षांत केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी सावनेर येथील श्रीकृष्ण सभागृहात रविवारी दुपारी ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा, संजय कुमार, टी. एन. झा, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सोनबा मुसळे, अरुण सिंह, दादाराव मंगळे, नितीन राठी, विजय देशमुख, किशोर मुसळे उपस्थित होते. हंसराज अहीर म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कोळशाच्या उत्पादनात वाढ झाली. पूर्वी कोळशाचे ३७ मिलियन टन उत्पादन व्हायचे. आता ते ४७ मिलियन टनावर गेले आहे. भविष्यात हे उत्पादन ६५ मिलियन टनावर जाईल. हे उत्पादन लक्षात घेता देशाला आगामी ५०० वर्षे कोळशाची कमतरता भासणार नाही, असा दावाही त्यांनी केला. सिंचनासाठी ८५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. देशातील काळाबाजार थांबला आहे. वस्तूंच्या किमती स्थिर केल्या आहेत. विजेचे दर कमी करण्यात आल्याने महाराष्ट्रात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे, असेही अहीर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात मजा करायला जात नसून ते विदेशातील मोठे उद्योग आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून रोजगार निर्मिती होणार असून, बेरोजगारी दूर होणार आहे. शिवाय, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात असल्याने स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, डॉ. राजीव पोतदार यांचीही भाषणे झाली. राजीव रंजन मिश्रा यांनी प्रास्ताविक केले तर, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे यांनी संचालन केले. वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक डी. एम. गोखले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. तीन लाख वीज कनेक्शन दिले - पालकमंत्रीसध्या विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना छत्तीसगडप्रमाणे कमी दरात वीज मिळत आहे. शिवाय, तीन लाख शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना किमान दोन पिके घेणे शक्य झाले आहे. पूर्वी सौर वीज १६ रुपये प्रतियुनिट होती. आता हे दर २.५० रुपये प्रतियुनिट करण्यात आले आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना २.८० रुपये प्रतियुनिट दराप्रमाणे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.