शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

आम्ही कर्तव्य पार पाडतोच

By admin | Updated: February 21, 2017 02:25 IST

आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही.

मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नये : ज्येष्ठांनी दिला विचारनागपूर : आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहण्यासारखाच अनुभव या ज्येष्ठांना निवडणुकांचा आहे. देशात बदलणारी परिस्थिती त्यांनी पाहिली आहे. त्या बदलाचे स्मरण आणि जाणीवही त्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीचा तसा उत्साह नसला तरी मतदान करण्याची आवश्यकता त्यांना माहिती आहे. त्यामुळे होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते. आयुष्याची सायंकाळ चांगली जावी ही माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची असते. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे, महानगरपालिकेशी जुळलेली लहान-मोठी कामे करता यावी एवढीच त्यांची इच्छा. हे करण्यासाठी आपला प्रतिनिधी चांगला असावा व प्रश्न सोडविण्यासाठी तो सक्षम असावा याची जाणीव त्यांना अनुभवातून मिळाली आहे. त्यामुळेच की काय संवैधानिक अधिकाराप्रति आणि सोबत आलेल्या कर्तव्याची त्यांना जाणीव आहे. लोकमतने या ज्येष्ठांशी साधलेला हा संवाद. (प्रतिनिधी)मतदान आमचा अधिकार आहेवयाची सत्तरी पार केली असल्याने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्यासारखा अनेक निवडणुकांचाही अनुभव आहे. कधी चांगला तर कधी वाईट. मनासारखे चित्र दिसत नसल्याने अनेक वेळा निराशाही होते. मात्र मतदान आमचा अधिकार आहे आणि तो निभावणे आमचे कर्तव्यही आहे. वारंवार मिळणारी ही संधी शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची इच्छा आहे. - सुदर्शन सुभेदारप्रत्येकाने कर्तव्य बजावले पाहिजेमतदान न करता व्यवस्था वाईट आहे, असे बोलणे योग्य नाही. कधी आपल्या मनासारखे होतेच, असे नाही. मात्र प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे. काही सकारात्मक बदल घडविण्याची इच्छा असेल तर मतदान हे केलेच पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून अनेक निवडणुका अनुभवल्या आहेत. लोकसभा, विधानसभा असो की महापालिका, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. - द.शा. पंडेआपण चुकायचे नाहीआपण मतदान करतो व अनेक वेळा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. निवडून गेलेला उमेदवार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, याची जाणीव होते आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवात ती अनेक वेळा झालीही आहे. निवडणूक कोणतीही असो, न चुकता मतदान करायचे ठरविले आहे.- माधुरी ठोसरचांगले घडेल, या अपेक्षेतून मतदानअनेक वर्षांचे अनुभव सारखेच आहेत, मात्र उत्साह आजही वाटते. परिस्थिती मात्र बदलली आहे. आपल्या मनासारखे होईलच असे नाही. मात्र निवडूना येणारा उमेदवार आपल्या समस्या सोडवेल, ही अपेक्षा कायम असते. त्यामुळेच आवर्जून मतदान करावे, असे वाटते. हे आमचे शहर आहे. त्यामुळे आमच्या एका मताने चांगले होत असेल तर ही संधी आम्ही का सोडावी. - संध्या ठोसर मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नयेजे लोक मतदान करणार नाही त्यांना अमूक काम झाले नाही, असा जाब विचारण्याचाही अधिकार नाही. मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाही जिवंत असण्याचे प्रतीक आहे. यातूनच आम्हाला आमचा प्रतिनिधी निवडायचा आहे. बदल हा घडणारच. मात्र तो घडविण्याची जबाबदारी आमची आहे. - शरद देवपुजारी उत्साहापेक्षा कर्तव्याची जाणीवमाझे वय ८० वर्षांच्यावर आहे. पक्षाची कामेही केली आहेत. त्यामुळे तरुणांसारखा उत्साह नसला तरी कर्तव्याची जाणीव मात्र आहे. आज परिस्थिती बदलली आहे. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे यासाठी योग्य माणसे सभागृहात पोहोचावी, ही अपेक्षा नेहमीच असते. या अपेक्षेतूनच न चुकता मतदान करण्याची इच्छा असते.- मधुकर रोटकर