शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

इच्छा तेथे मार्ग; ‘वन लेग वंडर’ अशोक मुन्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 10:49 IST

‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेला शहरातील युवक अशोक मुन्ने याने आपल्या अपंगत्वावर मात करताना नवी उंची गाठली आहे. त्याची जीवनगाथा बघितल्यानंतर ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती येते.

ठळक मुद्दे ‘अपंगत्वाचा बाऊ न करता निर्धार आणि धैर्य असेल तर अपंगत्वावर मात करता येते. निर्धार असेल तर प्रत्येक जण (ही किंवा हा) धावू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेला शहरातील युवक अशोक मुन्ने याने आपल्या अपंगत्वावर मात करताना नवी उंची गाठली आहे. त्याची जीवनगाथा बघितल्यानंतर ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती येते. आता तो नागपुरात ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लोकमतच्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे.२००९ मध्ये रेल्वे अपघातात अशोकने उजवा पाय गमावला. चुकीच्या झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याला वर्षभर बेडवर रहावे लागले. २०१२ मध्ये पुणे येथे त्याने कृत्रिम पाय लावल्यानंतर त्याच्या ‘हीरो’ बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. पांगळेपणामुळे अनेकदा अपयश आल्यावर सुरुवातीला तो निराश झाला पण, त्यानंतर त्याने पांगळेपणाचा बाऊ न करता लढवय्या बाणा जपताना मी कुठेही कमी नसल्याचे जगाला दाखवून दिले.लोकमतने मॅरेथॉन आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत बोलताना ३३ वर्षीय मुन्ने म्हणाला,‘लोकमत भव्य-दिव्य पद्धतीने मॅरेथॉनचे आयोजन करीत आहे, ही चांगली बाब आहे. यामुळे शहरातील धावपटूंसाठी नव्या आशा निर्माण होतील. लोकमतच्या अनेक कार्यक्रमात यापूर्वीही मी सहभागी झालेले आहो. हा इव्हेंटसुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल, अशी खात्री आहे.’मुन्ने अलीकडे कोची मॅराथॉनमध्ये सहभागी झाला होता आणि त्यापूर्वी त्याने २२ किलोमीटर सातारा हिल्स मॅरेथॉन २०१३ मध्ये पुरस्कार पटकाविला आहे.अपंगत्वाबाबत विचारले असता प्रेरणादायी प्रवास असलेला मुन्ने म्हणाला, ‘अपंगत्वाचा बाऊ न करता निर्धार आणि धैर्य असेल तर अपंगत्वावर मात करता येते. निर्धार असेल तर प्रत्येक जण (ही किंवा हा) धावू शकतो.मी तसा गिर्यारोहक आहे. मी चीनच्या बाजूने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ३५० मीटर अंतर शिल्लक असताना मला मोहीम अर्ध्यावर सोडावी लागली. त्यानंतर मी अन्य क्रीडा प्रकारात कौशल्य मिळवण्याचे ठरविले.’जगातील सर्वांत उंच मार्ग खरदुंग ला (१८,३८० फूट) येथे बाईक राईड करणारा मुन्ने हा शारीरिकदृष्ट्या अपंग असताना अशी राईड करणारी पहिली व्यक्ती आहे, याचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. तो रोज ३-४ किलोमीटर जलतरण करतो त्याचसोबत मार्शल आर्ट व योगासनाचा नियमित सराव करतो.मुन्ने म्हणाला,‘मी नागपूर मॅरेथॉनसाठी सरावाला सुरुवात केली आहे. यापूर्वी मी रोज सकाळी ३ किलोमीटर धावण्याचा सराव करीत होतो, पण नागपूर मॅरेथॉनची घोषणा झाली तेव्हापासून या अंतरात दोन किलोमीटरची भर पडली आहे.’नागपूर महामॅराथॉनच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुन्ने यांनी नागपूरकरांना शारीरिक स्वास्थ्यासाठी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.मुन्ने म्हणाला,‘स्पर्धा, विजय किंवा पराभव हे सगळे वेगळे विषय आहे. मी नागपूरकरांना स्वास्थ्य राखण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. धावणे हा स्वस्त क्रीडा प्रकार आहे. त्यासाठी महागड्या साहित्याची गरज नाही. प्रत्येकाला परडवणाऱ्या खर्चात या क्रीडा प्रकाराची हौस भागविता येते. लोकमतने नागपूरकरांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.’मुन्नेच्या जीवनातून प्रेरणा व धैर्य याचा वस्तुपाठ घेण्यासारखा आहे. केवळ आपल्या कमकुवतपणावर मात न करता ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती देणारे त्याचे जीवन आहे.

टॅग्स :Lokmat Nagpur Maha Marathon 2018लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८