शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आग विझविण्यासाठी लवकर मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:59 IST

नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशहरात नवीन ९७ हायड्रंट : १.१० कोटीचा निधी वळता करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत. यासाठी इतर विभागाचा १.१० कोटींचा निधी वळता करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी २० नोव्हेंबरला होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.शहराच्या कोणत्याही भागात आग लागल्यास ती तातडीने विझवता यावी, यासाठी ब्रिटिशांनी १९४७ च्या सुमारास अग्निशमन विभागाचे तब्बल एक हजार हायड्रंट उभारले होेते. परंतु यातील फक्त नऊ हायड्रंट सुरू आहेत़ जलप्रदाय विभागाने नवीन हायड्रंट लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता़ मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. २४ बाय ७ योजनेंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. परंतु या जलवाहिन्यांना हायड्रंट जोडण्यात आलेले नाही.तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने जुने हायड्रंट जमिनीखाली दबले आहेत. अग्निशमन विभागाने हायड्रंट लावण्यासाठी ११६ जागा चिन्हांकित केल्या. यातील ९ हायड्रंट सुरू आहेत. तर ९७ नवीन फायर हायड्रंट लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.बंद असलेले व दुरुस्त करण्याजोगे असणाºया हायड्रंटच्या दुरुस्तीकरिता २ लाख ६ हजार ८३० रुपये व नवीन हायड्रंट उभारण्याकरिता १ कोटी ५ लाख ४८ हजार ८७३ इतका खर्च अपेक्षित होता़विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती़. परंतु आर्थिक अडचणीमुळे हा निधी उपल्बध झाला नाही. त्यामुळे अन्य खात्यातून १.१० कोटीचा निधी वळता केला जाणार आहे.आग नियंत्रणाठी हायड्रंट आवश्यकशहरात आग लागल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवता यावे व लवकर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शहराच्या विविध भागात एक हजार हायड्रंट उभारण्यात आले होते़ आग विझविण्यासाठी हायड्रंटवरून पाणी उपलब्ध करून दिले जायचे़ कालांतराने नव्या वाहिन्या टाकण्यात आल्या़, मात्र त्यांना हायड्रंटशी जोडले गेले नाही तसेच नवीन हायड्रंट लावण्यात आलेले नाही. आग लागल्यास ती तातडीने नियंत्रणात यावी. यासाठी हायड्रंट उभारणे आवश्यक आहे.