शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून पाणी पोहोचणार तापी-पूर्णेच्या खोऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 06:59 IST

Water News : केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मंजूर झाला आहे.

- गोपालकृष्ण मांडवकर नागपूर - केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मंजूर झाला आहे. पूर्व विदर्भातील गोदावरी- वैनगंगेच्या खोऱ्यातून अतिरिक्त पाणी घेऊन  ते पश्चिम विदर्भातील तापी-  पूर्णाच्या खोऱ्यात वळविण्याचा हा प्रकल्प आहे. अर्थात, पूर्वेचे पाणी पश्चिमेचा ४२६ किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातील शेतकऱ्यांची  हिरवी स्वप्ने साकारणार आहे. प्रकल्पाचा डीपीआर तीन वर्षांपासून तयार असून, आता केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा आहे. केंद्रीय जल आयोग आणि  केंद्रीय जल मंत्रालयाने १९८० मध्ये देशात नदीजोड प्रकल्प आखला. त्यानंतर १७ जुलै १९८२ मध्ये प्रकल्पाच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय जल विकास अभिकरणाची स्थापना केली. पुढे २००९ मध्ये राज्य  सरकारने राज्यातील तीन  नदीजोड प्रकल्पांचे प्रस्ताव अभिकरणाकडे पाठविले. त्यापैकी विदर्भातील वैनगंगा- नळगंगा  हा प्रकल्प मान्य करण्यात  आला.

नळगंगेत पोहोचणार ३७.५८ दलघमी पाणी या योजनेसाठी गोसेखुर्द प्रकल्पातून १,७७२ दलघमी पाणी उचलले जाणार आहे. ते लोअर वर्धा, काटेपूर्णा या प्रकल्पामधून मार्गातील ३९ तलावांमधून खेळवत ४२६.५४२ किलोमीटर प्रवास करीत हे पाणी नळगंगा प्रकल्पात पोहोचविण्याची योजना आहे. सिंचन, पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वापरानंतर ३७.५८ दलघमी पाणी नळगंगेत सोडले जाणार आहे. नळगंगा प्रकल्पाची साठवणूक ६९.३२ दलघमी आहे. त्यात ही भर पडल्यावर हा साठा ९८.९० दलघमीवर पोहोचणार आहे.  

प्रकल्पाची व्याप्ती वैनगंगा (नागपूर-भंडारा/पूर्व विदर्भ) ते नळगंगा (बुलडाणा/पश्चिम विदर्भ)  एकूण जिल्हे : सहा (नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा), एकूण तालुके - १५ ओलिताखाली येणारे क्षेत्र : ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर प्रकल्पाचे आयुर्मान : १०० वर्षे २०५० पर्यंत सिंचन क्षमता- : १६,९४० हेक्टर

चार प्रकल्प जुळणारप्रकल्पात पूर्व आणि पश्चिम विदर्भातील चार प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या प्रवासात वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्प (आर्वी), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (बार्शिटाकळी) आणि बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा) प्रकल्पात पाणी पोहोचणार आहे. या मार्गामध्ये येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील १५ तालुक्यांमध्ये ३५ तलाव खोदले जाणार असून, चार तलावांची क्षमता वाढविली जाणार आहे. हे पाणी या ३९ तलावांमध्ये साठवले जाणार आहे. या तलावांतून २,८७८ हेक्टर कृषिक्षेत्राला लाभ मिळणे प्रस्तावित आहे. 

टॅग्स :Waterपाणी