शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील पाण्याचे टँकर ‘अनफिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:37 IST

ऊन वाढताच पाण्याच्या टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु वसाहतींच्या गल्ली बोळ्यातून हजारो टन पाणी वाहून नेणारे उपराजधानीतील अनेक टँकर ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे‘फिटनेस सर्टिफिकेट’ विनाच रस्त्यावर नागरिकांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊन वाढताच पाण्याच्या टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु वसाहतींच्या गल्ली बोळ्यातून हजारो टन पाणी वाहून नेणारे अनेक टँकर ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तहान भागविणारे टँकरच नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे वास्तव आहे.वाढत्या रस्ते अपघातांची कारणे विविध असली तरी यातील महत्त्वाचा भाग म्हणजे वाहनाचा फिटनेस. हा उत्तम असल्यास बहुतांशवेळा अपघात टाळता येतो; मात्र शहराच्या गल्ली-बोळ्यात लोकांची तहान भागविणाऱ्या बहुसंख्य टँकरचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) फिटनेस सर्टिफिकेटच (योग्यता प्रमाणपत्र) घेतले नाही. यामुळे हे टँकर कर्दनकाळ ठरत आहे. महापालिकेनेही योग्यता प्रमाणपत्राची तपासणी न करताच कंत्राट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी केंद्र शासनाचे काही नियम आहेत. त्याअंतर्गत वाहनाची प्रत्यक्ष चाचणी आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकाकडून करणे बंधनकारक आहे. या चाचणीत वाहनाचा ब्रेक, हेडलाईट, गेअर, वाहनाची स्थिती, क्षमता व इतर गोष्टी प्रत्यक्षपणे तपासल्या जातात.मात्र बहुसंख्य टँकरचालक याकडे लक्षच देत नाही. कारवाईही होत नसल्याने टँकरचालकांना रान मोकळे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी एका टँकर चालकाने दोन विद्यार्थिनींना जबर धडक दिली. यात एकीचा करुण अंत तर दुसरी गंभीर जखमी झाली होती. यानंतर आरटीओ कार्यालयाकडून टँकरची तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे टँकर चालकाचे धाबे दणाणले होते.परंतु नंतर कारवाईची मोहीम थंड पडल्याने जास्तीत जास्त फेऱ्या मिळण्यासाठी टँकर भरधाव धावत असल्याचे चित्र सामान्य झाले आहे. विशेष म्हणजे, आरटीओने किती टँकर चालकांना फिटनेस सर्टिफिकेट दिले याची नोंदही नसल्याचे समोर आले आहे.

कंत्राट देण्यापूर्वी तपासणीच झाली नाहीमहापालिकेने टँकरमालकाला कंत्राट देण्यापूर्वी त्याच्या वाहनाची तपासणी आरटीओकडून करून घेणे आवश्यक असते. परंतु तसे होत नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यामुळे खराब स्थितीतील टँकरही आज रस्त्यावर धावत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक