शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मैदानासाठी पाण्याची टाकी ‘कुर्बान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 10:14 IST

आचारसंहितेच्या काळात टाकीच्या कामाचे भूमिपुजन होऊन खोदकामालाही सुरुवात झाली. पण टाकी ज्या मैदानात बांधण्यात येत आहे ते मैदान परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे स्थळ असल्याने मैदान वाचविण्यासाठी पाण्याच्या टाकीला विरोध होत होत आहे.

ठळक मुद्देपवनसूतनगरातील बांधकाम थांबले शिवसेनेक डून विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व आणि दक्षिण नागपूरच्या मधात पवनसूतनगरातील हनुमान मंदिर परिसरात पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. आचारसंहितेच्या काळात टाकीच्या कामाचे भूमिपुजन होऊन खोदकामालाही सुरुवात झाली. पण टाकी ज्या मैदानात बांधण्यात येत आहे ते मैदान परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे स्थळ असल्याने मैदान वाचविण्यासाठी पाण्याच्या टाकीला विरोध होत होत आहे. शिवसेनेने हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे.मनपा नेहरूनगर झोनअंतर्गत न्यू डायमंडनगर, न्यू गाडगेबाबानगर, भाग्यश्रीनगर, गाडगेनगर, डायमंडनगर, चिटणीसनगर, पवनसूतनगर, मित्रविहारनगर या वस्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. पाण्याच्या टँकरसाठी नागरिकांना दररोज सकाळी नगरसेवकांच्या दारापुढे रांगेत उभे राहावे लागते, रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. त्यामुळे या भागात पाण्याची टाकी उभारून परिसरातील नागरिकांचा त्रास कमी व्हावा, या उद्देशातून भाजपा आमदाराच्या प्रयत्नातून पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहितेच्या काळात कामाचे भूमिपूजन करून पवनसूतनगरातील हनुमान मंदिराच्या मैदानात खोदकाम सुरू करण्यात आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केल्याने ठेकेदाराने पोलिसांच्या बंदोबस्तात काम केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून काम बंद पडले आहे.मैदानात होणाऱ्या कार्यक्रमासाठी टाकीच्या बांधकामाला शिवसेनेने विरोध केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाणीटंचाई परिसरातील नागरिकांना भेडसावत असताना शिवसेनेचे धोरण योग्य नसल्याचेही मत काही लोकांनी व्यक्त केले. दरम्यान काम बंद राहिल्यास पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून खड्डा धोकादायक ठरणार आहे.मैदान वाचले पाहिजे ही आमची भूमिका आहेटाकीच्या बांधकामाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक किशोर कुमेरिया यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की या मैदानात चार मंदिर आहे. हे मैदान परिसरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती मैदान आहे. सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात. पाण्याच्या टाकीला आमचा विरोध नाही. टाकीमध्ये मैदानाचा बहुतांश भाग जातो आहे. मैदान वाचले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधींशी मनपाने समन्वयाची भूमिका ठेवली नाही. आम्ही टाकीसाठी मंदिर शिफ्ट करायला तयार आहे. मी तसा दीड वर्षांपूर्वी टाकीच्या बांधकामावर आक्षेपही घेतला आहे. बाजूलाच गाडगेनगरचे ३.५ एकरचे मैदान आहे. तिथेही ही टाकी शिफ्ट करता येऊ शकते. पण प्रशासन आपल्या भूमिकेवर ताठ असून, शिवसेनाही मैदान वाचविण्यासाठी कुठलीही तडजोड करणार नाही.तांत्रिक कारणामुळे टाकी मैदानातच उभारण्यात आलीयासंदर्भात स्थानिक भाजपाच्या नगरसेविका रेखा साकोरे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, पाण्याची टाकी बनल्यास परिसरातील लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. ही टाकी गाडगेनगरच्या मैदानात उभारण्यात यावी, असाही प्रस्ताव होता. पण मनपाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारण सांगितल्यामुळे टाकी पवनसूतनगरच्या मैदानातच उभारण्यात आली. टाकीचे बांधकाम बंद असल्याचे लोकांकडून मला माहिती पडले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक