शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याची कामे वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:36 IST

खनिकर्म विभागाकडून खनिज निधी देण्यात टाळाटाळ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची ९८ कामे वांध्यात आली आहेत.

ठळक मुद्देखनिज निधी देण्यास खनिकर्म विभागाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खनिकर्म विभागाकडून खनिज निधी देण्यात टाळाटाळ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची ९८ कामे वांध्यात आली आहेत. हा निधी जवळपास सात कोटीच्या वर असून, जिल्हा परिषदेने ९८ कामाच्या निविदाही काढल्या आहेत. निधी उपलब्ध झाला नसल्याने काम करणाऱ्या कंत्राटदारांचा जीव टांगणीला लागला आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी टंचाईची कामे वेगाने व्हावी, यासाठी त्यांनी एका संयुक्त बैठकीत खनिकर्म विभागाला ८ कोटी ६२ लाख ९७ हजार ३५२ रुपयांचा निधी ९८ कामांसाठी देण्याचे सुचविले होते़ त्यानंतर तडकाफडकी १ कोटी ५२ लाख ४३ हजार ८८१ रुपयांचा निधी देण्यात आला़ पालकमंत्र्यांचा आदेश असल्याने जिल्हा परिषदेने ९८ कामांची निविदा काढून प्रत्यक्षात कामेही सुरू केली़ परंतु, आता निधीच खनिकर्म विभाग देत नसल्याने कंत्राटदारांच्या जीवात जीव उरला नाही़ काहींनी निधीसंदर्भात कार्यकारी अभियंता आणि अध्यक्षा निशा सावरकर यांची भेट घेतली़ त्यांना सर्व तपशील सांगण्यात आला़ परंतु, सकारात्मक निर्णय नसल्याने ९८ कामांचे भवितव्यच संकटात सापडले आहे़जिल्हा परिषदेतून निधी मागणीचा प्रस्ताव खनिकर्मला गेल्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे ही फाईल गेली़ त्यांनी जिल्हा परिषद आणि खनिकर्म विभागाने चर्चा करा असे लिहून प्रस्ताव राखून ठेवला आहे़ आठवड्याभरात यावर निर्णय न झाल्यास पाणी टंचाईसाठीच्या निमार्णाधीन योजना धोक्यात येण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Waterपाणी