मनपा-ओसीडब्ल्यूची जलकुंभ स्वच्छता मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहिमेंतर्गत वंजारीनगर जलकुंभ (नवीन) सोमवारी तर हनुमाननगर जलकुंभ येत्या बुधवारी स्वच्छ करण्याचे ठरविले आहे. स्वच्छतेच्या दिवशी या जलकुंभावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान पाणीपुरवठा होणार नाही.
तसेच यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
वंजारीनगर जलकुंभामुळे सोमवारी बाधित राहणारे भाग : जुना व नवा बाभुळखेडा, कुकडे ले-आऊट, वसंतनगर, वंजारीनगर, जुने व नवे कैलासनगर, चंद्रमणीनगर, जोशीवाडी, श्रमजीवीनगर, प्रगतीनगर, रामेश्वरी रोड, विश्वकर्मानगर, बजरंगनगर, सावित्रीबाई फुलेनगर, म्हाडा क्वाॅर्टर, पोलीस क्वाॅर्टर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सोमवारी क्वाॅर्टर, रघुजीनगर, आयुर्वेदिक ले-आऊट, आदिवासी कॉलनी.
हनुमाननगर जलकुंभामुळे बुधवारी बाधित राहणारे भाग : हनुमाननगर, प्रोफेसर कॉलनी, चंदननगर, पीटीएस क्वाॅर्टर, वकीलपेठ, महेश कॉलनी, सोमवारी क्वाॅर्टर, सिरसपेठ, सरईपेठ, रेशीमबाग.