शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

३७ हजार लोकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा

By गणेश हुड | Updated: May 31, 2024 20:16 IST

उन्हाची तीव्रता अन् ग्रामीणमध्ये १४ गावांत पाण्याचे संकट!

नागपूर :  नागपूरसह विदर्भात दिवसेनदिवस तापमानामध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसात नागपूरचा पारा  ४४ ते ४५ अंशावर पोहचला आहे. त्यात  ग्रामीण भागात जल जीवन मिशन (जेजेएम) अंतर्गत करण्यात येणारी कामे  अनेक गावांत पूर्णत्वास आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण जनतेला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक झळ हिंगणा व पारशिवनी तालुक्यांना बसली आहे.  १४ हून अधिक गावांमध्ये सुमारे ३७ हजारांहून अधिक नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

केंद्र शासनाने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाव्दारे पाणी पुरवठ्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार देशभरात जल जीवन मिशन (जेजेएम) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात जेजेएमच्या माध्यमातून १३४४ गावांमध्ये कोट्यावधीच्या निधीतून कामे सुरू आहे. जवळपास ४००  गावांतील कामे पूर्णत्वास आल्याचे सांगण्यात येते.  बहुसंख्य कामे अद्यापही सुरूच झालेली नाही.   त्यात  उन्हाची तीव्रता दिवसेनदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई भीषण झाली आहे़ विहीर आणि बोअरवेलची पाणी पातळी तळाशी गेल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती घालावी लागत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील पारशिवनी आणि हिंगणा तालुक्यात सुमारे ३७ हजारांहून अधिक नागरिकांची १४ टँकरच्या माध्यमातून तहाण भागवावी लागत आहे. 

या गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा हिंगणा तालुक्यातील धानोली गुमगाव, सुकळी कलार, धानाली कवडस, नवेगाव, डेगमा खुर्द (अंबाझरी, शेषनगर,कवडस), खापा निपाणी, इसासनी, नागलवाडी, वडधामना तर  पारशिवनीतील चारगाव, निमखेडा आणि ढवळापूर या १४ गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे.  यातील इसासनी हे दहा हजार २०० तर वडधामना हे १२ हजार लोकसंख्येची सर्वांत मोठी गावे आहेत़  पाणीटंचाई निवारणासाठी ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून १७५ बेरवेलचे फ्लॅशिंग करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूरwater shortageपाणीकपात